डहाणूतील तीन शेतकरी इस्त्रायलला, निम्मा खर्च कृषी विभागाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:28 AM2019-02-20T04:28:06+5:302019-02-20T04:28:33+5:30
निम्मा खर्च कृषी विभागाचा : बळीराजांमध्ये उत्साह, मिळणार शेतीचे नवे धडे
बोर्डी : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे२२ ते २८ फेब्रुवारी या काळातील इस्त्रायल कृषी अभ्यास दौऱ्याकरिता तालुक्यातील स्नेहल अनंतराव पोतदार (जामशेत), देवेंद्र गोविंद राऊत(नरपड) आणि प्रवीण वासुदेव बारी (कंक्राळी) यांची निवड झाली आहे.
इस्त्रायलमधील जमीन रेतीमिश्रीत असून सिंचन व्यवस्था व पॉलिहाऊस या नव्या तंत्रज्ञानातून कमी जागेत फळे व भाजीपाल्याचे विक्र मी पीक घेण्याची किमया येथील शेतकºयांनी केली आहे. त्यासह फळं-भाजीपाल्याचे प्रोसेसिंग व मार्केटिंग आदीवर त्यांची हुकमत आहे. हे ज्ञानभारतीय शेतकºयांना व्हावे, म्हणून शासनाच्या तालुका कृषी विभागातर्फे डहाणूतील या शेतकºयांची निवड केली आहे. या करिता शासनाकडून ६० हजार रु पयाचे अनुदान देण्यात येत आहे. तर उर्वरीत ६० हजार ५०० रुपयांचा खर्च स्वत: शेतकºयाने करायचा आहे. निवडलेल्या शेतकºयांचा अभिनंदन सोहळा सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी संतोष पवार, मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, शिवाजी इंगळे आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या देशाच्या शेती क्षेत्रातील विविध आधुनिक प्रयोगाची माहिती दौºयातून मिळणार आहे. शेतीतील संशोधनासह यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानातून अवगत केलेल्या विकासातून जगापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. या अभ्यासातून मिळणाºया अनुभवाद्वारे शेतकºयांच्या ज्ञान शाखा विस्तारतील, त्याचा वैयक्तिकतेसह अन्य शेतकºयांना फायदा होईल असे मत कृषी अधिकारी संतोष पवार यांनी व्यक्त केले. बदलत्या वातावरणात व यंत्राच्या मदतीने शेती प्रगत करण्याचे तंत्रज्ञान या देशाच्या शेतकºयांनी प्राप्त केले आहे. निवड झालेले प्रयोगशील शेतकरी ते आत्मसात करतील असा विश्वास मंडळ अधिकारी अनिल नरगुलवार यांना आहे. तर आमची निवड सार्थ ठरवू असे तिन्ही शेतकºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
परदेशी अभ्यास दौºयाकरिता मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. तेथील पीक पद्धतीची तंत्रज्ञानाशी सांगड घालून केलेला विकास शिकण्यासारखे आहे. वैयक्तिक आणि सामूहिकरित्या शेतकºयांना लाभदायक ठरावा म्हणून प्रयत्न करणार.
-देवेंद्र राऊत,
निवडलेले शेतकरी