महावितरणकडे भरपाईसाठी साडेतीनशे अर्ज
By admin | Published: July 9, 2017 01:14 AM2017-07-09T01:14:45+5:302017-07-09T01:14:45+5:30
डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी
- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी या तक्र ारी नसून त्या म्हणजे अविरत ३४ तास पुरवठा खंडित राहिल्याने साडेतीनशे ग्राहकांनी नुकसानभरपाईसाठी केलेले दावे आहेत.
डहाणू शहरात ३० जून रोजी सकाळी १० वाजता वीज खंडित झाली होती. त्यानंतर तब्बल ३४ तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. पावसाळ्याच्या हंगामात रात्री अंधारात काढाव्या लागल्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागला. रोजगारावरही त्याचा परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे भरपाई मिळावी या करीता डहाणू शहराच्या पश्चिमेला असलेल्या रेल्वे स्थानक परिसर, बस आगार, इराणी रोड या परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या सुमारे ३५० वीज ग्राहकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या करिता वीज कायद्यातील एमईआरसी २०१३ च्या कलमानुसार प्रतितास ५० रु पयांप्रमाणे ३४ तासांचे १७०० रु पये मिळावेत असे ग्राहकांचे म्हणणे आहे. सोसायटी फॉर जस्टीस ही संस्था या प्रकरणात ग्राहकांच्या बाजूने उभी राहिली आहे.
दरम्यान या प्रकरणा विषयी डहाणू वीज कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता बी. एस. धोडी यांच्याशी संपर्क साधला असता ग्राहकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, ३० जून या काळात तालुक्यात वादळीवाऱ्याने हा वीज पुरवठा खंडित झाल्याने नैसिर्गक आपत्ती असताना ही तरतूद लागू होत नाही. त्यामुळे अशी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याचे लेखी उत्तर
पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसान भरपाईची मागणी करणारे अर्ज वीज ग्राहकांनी कार्यालयाकडे पाठवले आहेत. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीकाळात ती तरतूद लागू नसल्याने त्यांना लाभ मिळणार नसल्याचे उत्तर पत्राद्वारे ग्राहकांना पाठविले जाणार आहे.
-बी. एस. धोडी, उप कार्यकारी अभियंता, महावितरण (डहाणू)