धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:08 AM2020-08-17T02:08:07+5:302020-08-17T02:08:12+5:30

धरणाचे तीन दरवाजे रविवारी सकाळी ११ वाजता उघडले असल्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे.

Three gates of Dhamani dam opened | धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले

धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले

googlenewsNext

कासा : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून झालेल्या जोरदार पावसामुळे कासाजवळील धामणी ९६ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे रविवारी सकाळी ११ वाजता उघडले असल्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारे व वसई-विरार महानगरपालिका, बोईसर औद्योगिक क्षेत्र, डहाणू, पालघर नगरपालिका आदी भागाला पाणीपुरवठा करणारे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण ९६.२२ टक्के भरले आहे.

धरणाची पाण्याची पातळी ११७.७५ मीटर वाढली आहे, तर धरणातील पाणीसाठा २७४.८७६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे तीन दरवाजे दीड फूटपर्यंत उघडले असून धरणातून ४ हजार ६५५ क्युसेक पाणी सोडले आहे. तर त्याखालील कवडास धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे एकूण १० हजार ६१४ क्युसेक पाण्याचा निसर्ग सूर्या नदीत होत असून सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात आतापर्यंत १६३७ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरण उशिराने भरले आहे, मात्र धरण भरल्याने उन्हाळ्यातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

Web Title: Three gates of Dhamani dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.