जीपच्या टक्करीत ३ प्रवासी ठार, १४ जखमी
By admin | Published: February 26, 2017 02:23 AM2017-02-26T02:23:01+5:302017-02-26T02:23:01+5:30
वाडा-सोनाळे मार्गावरील सोनशिव गावाजवळील वळणावर व प्रवासी वाहतूक करणारी जीप एसयूव्ही यांच्यात झालेल्या टक्करीत अनिता साबळे, आशा साबळे दोघी (सोनाळे)
वाडा : वाडा-सोनाळे मार्गावरील सोनशिव गावाजवळील वळणावर व प्रवासी वाहतूक करणारी जीप एसयूव्ही यांच्यात झालेल्या टक्करीत अनिता साबळे, आशा साबळे दोघी (सोनाळे) व जक्की रौफ शेख (वाडा) ठार झाले असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी सायंकाळी सोनशिव गावाजवळ सोनाळ्याहून वाड्याकडे जाणारी प्रवासी वाहतूक करणारी खाजगी जीप व वाड्यातून सोनाळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एसयूव्हीची जोरदार धडक झाली. या अपघातात अशोक गणपत ठाकरे (३०), अजय डगला (१५), महेश खेवरे, अंकिता पुजारी, विद्या खेवरे (१६), मयुरी खेवर, सचिन नाचण (२१), दर्शना जाधव (१८), पूनम वांगडा, भूमिका पुजारी (३) या जखमींवर वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अर्जुन चव्हाण, सुनील वणगा व अनंता साबळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. एसयूव्हीचा चालक कल्पेश पाटील यांच्यावरही एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रस्त्यावरून जाणारी वाहने अत्यंत भरधाव असतात. अनेकदा वाहन चालविण्याचे तंत्र पूर्णपणे अवगत नसतानाही ती चालविली जातात. त्यातून हे अपघात घडतात. त्यात खराब रस्त्यांचीही भर पडते. त्यात बळी मात्र निरपराधांचा जातो. (वार्ताहर)