एटीएममधून तिघांचे पैसे हडप , एटीएमच्या सीसीटीव्हीत नायजेरियन : पैसे काढण्यात नायजेरियन टोळीचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:51 AM2018-01-26T01:51:05+5:302018-01-26T01:51:19+5:30

वसईतील तामतलाव येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून शनिवारी पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून मंगळवारी पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक नायझेरीय नागरीक सीसीटीव्हीत दिसून आला आहे.

 Three money from ATM, CCTV footage of ATM Citizens: Nigerian troop withdrawal | एटीएममधून तिघांचे पैसे हडप , एटीएमच्या सीसीटीव्हीत नायजेरियन : पैसे काढण्यात नायजेरियन टोळीचा सहभाग

एटीएममधून तिघांचे पैसे हडप , एटीएमच्या सीसीटीव्हीत नायजेरियन : पैसे काढण्यात नायजेरियन टोळीचा सहभाग

Next

वसई : वसईतील तामतलाव येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून शनिवारी पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून मंगळवारी पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक नायझेरीय नागरीक सीसीटीव्हीत दिसून आला आहे.
मारिया डायस, हेलन आणि अशरफ शेख या तिघांच्या खात्यातून मंगळवारी पैसे काढले गेल्याचा मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. मारिया यांच्या खात्यातून १०हजार ५०० रुपये, हेलन यांच्या खात्यातून ३८ हजार रुपये आणि अशरफ यांच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढण्यात आले आहेत.
या तिघांनी बँक आॅफ बडोदाच्या तामतलाव येथील एटीएममधून वेगवेगळ््या वेळी शनिवारी पैसे काढले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढल्याचे उजेडात आले आहे. मॅसेज आल्यानंतर त्यांनी बँकेत विचारणा केली असता तिघांच्याही खात्यातून भाईंदर येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिघांनीही याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ज्यावेळी तिघांनी एटीएममधून पैसे काढले त्यावेळी त्यांचा अकाउंड नंबर आणि पासवर्ड हॅक करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पैसे काढताना भाईंदर येथील एटीएमम सेंटरमध्ये एक नायझेरियन नागरीक आढळून आला आहे. त्यामुळे यामागे नायझेरियन टोळी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांकडून सावधगिरीच्या सूचना-
वसई, विरार व नालासोपारा या भागामध्ये नायझेरियन, केनिया व आफ्रिकन देशातील हजारा नागरिक तात्परत्या व्हिजावर राहत आहेत.
त्यांची बहुतेक वेळा नोंद नसते. त्याच्याकडून या पूर्वी सुद्धा अनेक गुन्हागारी कृत्य झाले असून त्यात सायबर गुन्हाचे प्रमाण मोठे आहे.
पोलिसांनी पैसे काढताना सावधागिरी बाळगा असे आवाहन केले असून प्रक्रीया पुर्ण होर्ई पर्यंत एटीएम सोडू नये असे सांगितले आहे.

Web Title:  Three money from ATM, CCTV footage of ATM Citizens: Nigerian troop withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.