स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:43 PM2022-03-03T16:43:19+5:302022-03-03T18:40:52+5:30

Drowning Case : समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली.

Three students drowned while trying to save others lives at kelve beach | स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Next

हितेंन नाईक


पालघर - केळवे बीच वरील समुद्रात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुले भरतीच्या प्रवाहात बुडत असताना त्यांना नाशिकमधून फिरायला आलेल्या चार विद्यार्थ्यांनी वाचविण्याच्या प्रयत्नात स्थानिक विद्यार्थ्यांसह नाशिक येथील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे.
    

केळवे बीच जवळील देवीचा पाडा येथील 4-5 स्थानिक अल्पवयीन मुले समुद्रात पोहायला गेली होती. त्याच वेळी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीत ही मुले बुडू लागली. त्याच दरम्यान नाशिक येथील ब्रह्मवेली नामक खाजगी कॉलेजमधील काही विद्यार्थी पोहत होते.त्यावेळी काही अल्पवयीन मुले समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर  कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम दिपक विसपुते, आणि अखिलेश देवरे या चार विद्यार्थ्यांनी त्या पुन्हा बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने झेप घेतली. ह्यावेळी समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली.

ह्यातील अखिलेश देवरे ह्याला वाचविण्यात यश आले असून स्थानिक मुलगा अथर्व नाकरे(वय १३वर्ष)रा.देवी पाडा, केळवे ह्याचा आणि नाशिक कॅज्या एका विद्यार्थ्यांचा अश्या दोघांचा मृतदेह आढळला आहे. अन्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात असुन बुडालेल्या दोन्ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माहीम च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याची माहिती केळवे पोलिसांनी दिली. काँक्युरर अकॅडमी, अशोक स्तंभ नाशिकच्या वतीने शैक्षणिक सहल केळवा समुद्रकिनारी आज गुरुवारी सकाळी 6वाजता खासगी ट्रॅव्हल बसने (एम.एच15 ई एफ 1515) रवाना झाली होती. बसमध्ये एकूण 39 विद्यार्थी होते.

Web Title: Three students drowned while trying to save others lives at kelve beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.