उत्तरप्रदेशात निघालेल्या शेकडो परप्रांतीयासहीत तीन विना परवानगी टेम्पो वसईतील सनसिटीत पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 06:21 PM2020-05-10T18:21:52+5:302020-05-10T18:22:02+5:30

तिन्ही टेम्पो चालक मालक-क्लिनरवर माणिकपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three unauthorized tempos, including hundreds from Uttar Pradesh, caught at Suncity in Vasai | उत्तरप्रदेशात निघालेल्या शेकडो परप्रांतीयासहीत तीन विना परवानगी टेम्पो वसईतील सनसिटीत पकडले

उत्तरप्रदेशात निघालेल्या शेकडो परप्रांतीयासहीत तीन विना परवानगी टेम्पो वसईतील सनसिटीत पकडले

googlenewsNext

-आशिष राणे

वसई : सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना परराज्यात स्थलांतर करण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही लेखी परवानगी न घेता व प्रवाशी वाहतूक संदर्भात  सवलतीचा गैरवापर केल्याप्रकरणी  माणिकपूर पोलिस ठाण्यात टेम्पो चालक- मालक सहीत क्लिनरवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली.

 

माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड 60 फुटी रोड वर शनिवारी नाकाबंदी दरम्यान  माणिकपूर पोलिसांकडून सुरू असणाऱ्या कसून तपासणीत या तिन्ही टेम्पोची चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा व वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 

मात्र परराज्यातील प्रवाश्यांच्या स्थलांतर वाहतूकसाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांची सशर्त परवानगीची अट आहे.

परंतु दिलेल्या सवलतीचे चुकीच्या पद्धतीने कायदा मोडून परराज्यातील लोकांची विनापरवानगी टेम्पो तून वाहतूक करणाऱ्यांकडून उल्लंघन होऊ नये याची दक्षता जिल्ह्यात तालुक्यात प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक तपासणी नाक्‍यावर पोलिसांकडून घेतली जात आहे.

असे असताना माणिकपूर पोलीस शिपाई शिवाजी डोळे सनसिटी पॉईंटवर नाकाबंदी वेळी शनिवारी उभे असतांना त्यांनी सनसिटी येथे एमएच -48- बी एन -1236 व एमएच- 48- एवाय -7138 आयसर कंपनी चे दोन टेम्पो यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यात अनुक्रमे 51 प्रवासी व दुसऱ्या टेम्पोत 35 प्रवासी मिळून आले त्याचवेळी दुसरीकडे अंबाडी रोड 60 फुटी रोडवर तिसरा टेम्पो एम एच -48 -टी-3385 हा पकडून  त्याची ही तपासणी व चौकशी केली असता त्यात 12 प्रवासी आढळून आले असे तिन्ही टेम्पोत एकूण 98 प्रवासी हे उत्तरप्रदेश राज्यात जात असल्याचे प्रवाश्यांनी पोलिसांना सांगितले. 

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी हे तिन्ही टेप्पो ताब्यात घेऊन चालक मालक व क्लिनर यांच्यावर कारवाई करीत या टेम्पोमधील पररप्रांतीय लोकांची  विनापरवानगी वाहतुक,पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान तसेच विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असताना मिळून आले म्हणून भा. दंड सं.188,269 तसेच साथरोग नियंत्रण कायदा  व मोटार वाहन कायदा 51( ब) नुसार मोटार कलम 66/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिवारी सनसिटी व 60 फूट रोड वर नाकाबंदी वेळी हे तिन्ही टेम्पो मिळून आले त्यांना तपासले असता त्यात एकूण 98 पररप्रांतीय प्रवासी आढळून आले,टेम्पो चालक व मालक यांनी या प्रवाशांना घेऊन जातो अशी योजना आखली होती मात्र नाकाबंदीत हे उघड झाले.यामध्ये टेम्पो ताब्यात घेतले असून प्रवाशी सोडून चालक मालक व क्लिनर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे

माणिकपूर पोलीस ठाणे,वसई

Web Title: Three unauthorized tempos, including hundreds from Uttar Pradesh, caught at Suncity in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.