वसईत तिघांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:47 AM2017-07-20T01:47:07+5:302017-07-20T01:47:07+5:30
गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : गेल्या दोन दिवसांत वसईत तिघांचा बळी गेला आहे. तुंगारेश्वरच्या धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नालासोपारा येथे एकाचा तलावात बुडून तर वालीव येथे एकाचा शॉक लागून मृत्यू झाला.
रविवारी दुपारी भांडुप येथे राहणारा प्रतीक पेडणेकर (२३) हा तरुण आपल्या मित्रांसह तुंगारेश्वर धबधब्यात फिरायला आला होता. सर्व जण दारू पिऊन धबधब्यात पोहण्यास उतरले. मात्र, प्रतीकला न घेताच सर्व मित्र रविवारी रात्री मुंबईला परतले होते. प्रतीकच्या घरच्यांनी विचारणा केली असता तो मध्येच आमच्यातून निघून गेल्याने आम्हाला वाटले तो घरी गेला असावा, असे उत्तर त्याच्या मित्रांनी दिले होते. त्यामुळे सोमवारी प्रतीकचे नातेवाईक त्याला शोधण्यासाठी तुंगारेश्वर येथे आले होते. पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यातून प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला.
दुसऱ्या घटनेत मुसळधार पावसामुळे विजेची वायर तुटून साचलेल्या पाण्यात पडल्याने शॉक लागून वालीव खैरापाडा येथे राहणारा मनोहर भास्कर (२५) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना वालीवच्या फणसपाडा येथे घडली. तर तिसऱ्या घटनेत मंगळवारी दुपारी नालासोपारा येथे राहणारा दत्तू जाधव (४५) यांचा टाकीपाडा येथील तलावात बुडून मृत्यू झाला. तलाव परिसरात फिरत असताना तोल जाऊन पडल्याने ते बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.