पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:18 AM2019-11-15T00:18:14+5:302019-11-15T00:18:21+5:30

वसंतनगरी आणि एवरशाइन या झपाट्याने नागरीकरण झालेल्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

For a ticket of five rupees, it costs 5 rupees | पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये

पाच रुपयांच्या तिकिटासाठी मोजतात ५० रुपये

googlenewsNext

वसई : वसंतनगरी आणि एवरशाइन या झपाट्याने नागरीकरण झालेल्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पाच रूपयांच्या टपाल तिकीटासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना ५० रूपये रिक्षाभाडे देऊन वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयात यावे लागते.
या भागात टपाल कार्यालय सुरू व्हावे, यासाठी वसई रोड प्रवासी संघटनेने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वसईच्या पूर्वेकडील भागात वेगाने नागरीकरण झाले असून या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.तर हा भाग वसई रोड आणि नालासोपारा या दोन्हींच्या मध्यभागी येत असून येथील लोकसंख्या दहा लाखाच्या आसपास आहे. या भागात टपाल कार्यालय नाही. पूर्वी या भागातील नागरिक पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गौवराई पाडा टपाल कार्यालयात जात असत. मात्र या कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्यानंतर या कार्यालयाचे वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयात विलीनीकरण करण्यात आले. हे कार्यालयही एवरशाईन आणि वसंतनगरी पासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर आहे. एकाच टपाल कार्यालयातून दोन कार्यालयाचा कारभार सुरू झाल्यामुळे या कार्यालयात असंख्य टपाल व अन्य कागदपत्रांचा खच दिसून येतो.
काही वेळा टपाल पत्र तपासणीचे काम कार्यालयाबाहेरील ओट्यावर केली जाते. या वेळी टपाल आणि काही महत्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठे कर्मचारी तथा टपाल कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगत यांच्या पायाखाली तुडवली जात असल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे एवरशाइननगर येथील ज्येष्ठ नागरिकांना पाच रूपयांच्या टपाल तिकीटीसाठी वसई रोड पूर्वेकडील टपाल कार्यालयपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल पन्नास रु पये प्रवासावर खर्च करावे लागतात.
।कोंदट असे कार्यालय वसई रोड पूर्वेकडे मोठी औद्योगिक वसाहत असून येथील टपाल कार्यालयात टपाल आणि पार्सल येतात. कागदपत्रांमुळे कार्यालयात पाणी ठेवण्यासाठीही जागा नसते तर या कार्यालयातील कर्मचारी कशीबशी कसरत करून स्वत:ला बसण्यासाठी जागा करतात. दरम्यान, कार्यालयात येणाऱ्यांना कार्यालयात धड उभेही राहता येत नाही असी संतप्त प्रतिक्रि या वसई रोड प्रवासी संघटनेचे सचिव अशोक भाटिया यांनी दिली आहे.

Web Title: For a ticket of five rupees, it costs 5 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.