आदिवासी नृत्य स्पर्धेत तुळजापूरचे टिपरी पथक प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:12 AM2017-10-02T00:12:38+5:302017-10-02T00:12:46+5:30
यावेळी प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व नगर परिषद यांनी आयोजिलेल्या नृत्य स्पर्धे तुळाजापूरच्या पथकाने बाजी मारली.
हुसेन मेमन,
जव्हार : यावेळी प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व नगर परिषद यांनी आयोजिलेल्या नृत्य स्पर्धे तुळाजापूरच्या पथकाने बाजी मारली.
शनिवारी रात्री ११ वाजता गांधीचौक येथे तारपा नाच, ढोलनाच, गौरीनाच, टिपरीनाच आदीच्या स्पर्धा घेण्यात आल्या, यावेळी प्रमुख पाहुणे आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, नगराध्यक्ष संदिप वैद्य, सीमोल्लघन समिती सभापती निलेश घोलप उपस्थित होते.
या आदिवासी नृत्य पथकांनी आदिवासींची पारंपारिक कला दाखवून प्रेक्षकांचे मने जिंकली. प्रेक्षकांनीही आदिवासींच्या पथकांच्या कलेला भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेत १५ संघांनी सहभाग नोंदविला होता.
या नृत्यातील कलात्मक कसरती पाहून रसिक थक्क होऊन गेले होते. स्पर्धेसाठी या पथकांनी प्रदीर्घ काळ सरावही केला होता. पुढच्या वर्षी संघांची संख्या वाढेल असा आशावाद संयोजकांनी व्यक्त केला.