तुळिंज पोलीस ठाण्यातील लाचखोरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:07 PM2019-02-24T23:07:28+5:302019-02-24T23:07:37+5:30
तुळींज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या दोघा पोलीस कर्मचाºयांनी ३० हजार रु पयांची लाच मागितली होती.
नालासोपारा : पालघरच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीसांनी शनिवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाला लाचखोरी प्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे. उमेश गवई (४७) असे लाचखोरी प्रकरणात अटक झालेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस नाईक बाळू कुटे (३३) यांनीही याच लॉटरीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून लाचेची मागणी केल्यामुळे त्याला सह आरोपी बनविण्यात आले आहे.
तुळींज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या दोघा पोलीस कर्मचाºयांनी ३० हजार रु पयांची लाच मागितली होती. त्याचाच पहिला हप्ता म्हणून २० हजार रु पये घेताना शनिवारी रात्री पालघरच्या लाचलुचपत विभागाने तुळींज पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाºयांना लाचखोरी प्रकरणात अटक केल्याने पालघर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून दोघेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांचे रायटर आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्र ारदारांचा नालासोपारा शहरातील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉटरीचा व्यवसाय सुरू करायचा होता. याबाबत तक्र ारदारांनी पालघरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्र ार केली होती. लाचलुचपत विभागाने आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर शनिवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा रचला. यावेळी तक्र ारदाराकडून लाचेची २० हजार रु पये रोख रक्कम स्विकारताना सापळा रचलेल्या पोलीसांनी उमेश गवई याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली आहे.