पनवेल-डहाणू मेमूची वेळ आजपासून बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 04:00 AM2017-11-01T04:00:25+5:302017-11-01T04:02:09+5:30
पनवेलहून विरारकडे कधीही वेळेवर न येणाºया ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूची वेळ पश्चिम रेल्वेने बदलल्याने प्रवाशांना दिलासा लाभला आहे.
पालघर: पनवेलहून विरारकडे कधीही वेळेवर न येणा-या ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूची वेळ पश्चिम रेल्वेने बदलल्याने प्रवाशांना दिलासा लाभला आहे.
विरार स्थानकावर पनवेल डहाणू मेमूची रात्री येण्याची जुनी वेळ ८.३४ होती ती बदलून आता ९.१० करण्यात आली आहे तसेच ९.१० मिनिटांनी विरार वरून सुटणा-या लोकलची सुधारीत वेळ ८.३५ करण्यात आली आहे. हे बदल दि १ नोव्हेंबर २०१७ बुधवारपासून अमलात येणार आहेत.
सातत्याने उशिरा येणार्या या गाडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या गाडीची वेळ बदलण्याबाबत नागरिकांनी व प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे अनेकदा मागण्या केल्या होत्या.
डहाणू वैतरणा प्रवासी संस्थेनेही याबाबत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेतली होती. व या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे सुचवून व यासंबंधीचा पाठपुरावा वरिष्ठ अधिकाºयांकडे केला होता. यावर रेल्वेच्या अधिकाºयांनी या पनवेल डहाणू मेमूला ही समस्या मध्यरेल्वेमुळे भेडसावत असल्याचे सांगितले,
मात्र संस्थेच्यावतीने मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांशी सतत संपर्क व समन्वय साधून मेमूची वेळ बदलावी ही मागणी उचलून धरली होती, अखेर रेल्वेने प्रवाशांचे व प्रवासी संस्थेचे म्हणणे मान्य करून पनवेल डहाणू मेमूच्या वेळेत बदल केल्याचे पश्चिम रेल्वेने सूचित केले आहे.