... तोपर्यंत भाताणे ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:10 AM2017-10-30T00:10:49+5:302017-10-30T00:11:34+5:30
प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.
सुनिल घरत
पारोळ : प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.
हा एक्स्प्रेस वे वसई तालुक्यातील खार्डी, कोपर, चांदीप, भाताणे, आडणे आदी गावाच्या हद्दीतून जात आहे. या पैकी भाताणे ग्रामपंचायत हद्दीतून जात असलेल्या एक्स्प्रेस वे च्या जागेसाठी ज्या शेतकºयांच्या प्रकल्पग्रस्त म्हणून जमिनी जाणार आहेत त्या शेतकºयांनी एक्स्प्रेस वे विषयीची विशेष चौथी ग्रामसभा होऊ दिली नाही. या ग्रामसभेसाठी शासनाचा कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने आम्हा जमीन मालकांना पडलेल्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे आम्ही या विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकत असल्याचे प्रकल्पग्रस्त घरे व जमीन मालकांनी सांगितले. यावेळी बोलतांना येथील शेतकरी जमीन मालक व ज्यांची घरे जात आहेत त्यांनी सांगितले कि, आमच्या या भागातील ९० ते ९५ टक्के नागरिक हे शेतीवर आपली उपजीविका करत आहेत. असे असतांना आमच्या सुपिक जमिनी संपादित करताना शासनाने आमचे रास्त म्हणणे ऐकून घेणे जरु रीचे आहे.
वडीलोपार्जित शेत जमिनीचा व घरांचा मोबदला किती देणार हे सांगणे क्रम प्राप्त आहे. यासाठी शासकीय स्तरावरील एकादा सक्षम अधिकारी या विशेष ग्राम सभेला येणे महत्वाचे असताना ग्राम सभेसाठी नॅशनल हायवे अथॉरिटीचे महेश चव्हाण व वनखात्याचे लक्ष्मण टिकेकर हेच उपस्थित राहिल्याने आमचा भ्रमनिरास झाला.