तलासरीत आज १९ संघटना एकवटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:49 AM2017-08-09T05:49:06+5:302017-08-09T05:49:06+5:30
विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महाराष्ट्र-गुजरात मधील १९ संघटना तलासरी येथे ९ आॅगस्टला आंदोलन छेडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरणाला उध्वस्त करणाºया प्रकल्पांविरोधात महाराष्ट्र-गुजरात मधील १९ संघटना तलासरी येथे ९ आॅगस्टला आंदोलन छेडणार आहेत.
भांडवलदारांसाठी सरकार १८ औद्योगिक कॉरिडोर लादत आहेत. एकट्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी ४ लाख ३६ हजार ४८६ म्हणजे देशाच्या एकूण भूमीपैकी १३.८ % भूमी (गुजरातची ६२ %, महाराष्ट्राची १८% त्याने बाधित होेणार आहे. आपल्या देशाच्या १७ % लोकसंख्येला हा महाकाय प्रकल्प उध्वस्त करणार आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान यातील आदिवासी बेदखल होणार आहेत. आधीच प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्वच संपणार आहे. या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग, विकास आराखडा, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग भूमीपुत्रावर लादले जात आहेत. त्यासाठी पालघर, ठाणे जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव असलेले पाणी पळवले जात आहे. वाढवण बंदर तसेच सागरी महामार्ग हे मच्छीमार, शेतकºयाच्या मुळावर उठले आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वाढवणला जेएनपीटी पेक्षा मोठे बंदर होऊ घातले आहे. त्याच्यासाठी जंगल कापून, डोंगर फोडून समुद्रात भराव टाकून ५ हजार एकर जमीन तयार केल्याने संपूर्ण किनारपट्टी, शेतीवाडी, फळबागा उध्वस्त होणार आहेत. तसेच गुजरात मध्ये नारगोल बंदरच्या विकास व विस्ताराच्या नावाखाली शेकडो एकर शेत जमीन घेतली जात असून हजारो मच्छीमार व शेतकरी कुटुंब उध्वस्त होणार आहेत.पालघर-ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे तसेच गुजरात, दादरा नगर हवेली मधील १६३ गावातील शेत जमीनी घेण्याचा डाव आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा लोकल ट्रेन प्रवास सुसह्य करण्याऐवजी ८ तासाचा प्रवास अडीच तीन तासांवर आणण्यासाठी जनतेचे तब्बल १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लादली जात आहे. यालाच आंदोलकांचा विरोध आहे.
महाराष्टÑ, गुजरातमधील आदिवासींचा असेल सहभाग
९ आॅगस्ट या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन तसेच आॅगस्ट क्र ांती दिनाच्या निमित्ताने तलासरी येथे एस.टी.डेपो मैदानात दुपारी ११ वा. जमून सर्व विनाश प्रकल्पांना ‘‘चले जावं’’ इशारा देण्यासाठी ‘भूमिपुत्र बचाव आंदोलना’ च्या झेंड्या खाली भूमी सेना, आदिवासी एकता परिषद, खेडुत समाज (गुजरात), शेतकरी संघर्ष समिती, वाढवणं बंदर विरोधी संघर्ष समिती,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, सुर्या पाणी बचाव संघर्ष समिती, पर्यावरण संवर्धन समिती वसई, पर्यावरण सुरक्षा समिती, गुजरात, आदिवासी किसान संघर्ष मोर्चा, गुजरात, कांठा विभाग युवा कोळी परिवर्तन ट्रस्ट, सूरत,खेडुत हितरक्षक दल, भरु च,भाल बचाव समिती गुजरात, श्रमिक संघटना, प्रकृती मानव हितैषी कृषी अभियान, सगुणा संघटना व युवा भारत या १९ संघटना एकजुटीचे दर्शन घडवून तलासरीमध्ये बुधवारी आंदोलन छेडणार आहेत.