आज टूर डी वसई सायकल रॅली
By admin | Published: July 16, 2017 02:21 AM2017-07-16T02:21:12+5:302017-07-16T02:21:12+5:30
वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळावे व शरिराला उत्तम व्यायाम व्हावा यासाठी सायकलींचा वापर जास्तीत जास्त करावा हा संदेश देण्यासाठी वसईत रविवारी टुर डी वसई
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळावे व शरिराला उत्तम व्यायाम व्हावा यासाठी सायकलींचा वापर जास्तीत जास्त करावा हा संदेश देण्यासाठी वसईत रविवारी टुर डी वसई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या चौथ्या वर्षी सहाशेहून अधिक सायकलप्रेमींनी यात सहभाग घेतला आहे.
वसई तालुक्यात प्रदूषण वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. दुसरीकडे, वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे.
यावर उपाय म्हणून वसईत सायकलींचा वाढता वापर व्हावा. त्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सायक्लॉथॉनचे आयोजन व्हावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून माजी महापौर राजीव पाटील यांच्या संकल्पनेतून अमेय क्लासिक क्लब आणि सायकल व्हिलेजच्या संयुक्त विद्यमाने टूर डी वसईचे आयोजन केले जाते आहे.
निसर्गसौंदर्याचा मिळणार अनुभव
रविवार १६ जुलैला सकाळी सात वाजता विरार पश्चिमेकडील यशवंत नगरहून विरार ते वसई अशा टूर डी वसईला सुरुवात होणार आहे. ती सोपारा मार्गे वसई किल्ला, अर्नाळा, विरार असा ५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
वसईच्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेत यावा यासाठी पश्चिम भागातील मार्ग निवडण्यात आला आहे. वसई किल््ल्यात इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत इतिहासाची माहिती देणार आहेत.