‘सूर्या’च्या पाण्यासाठी आज जिल्हाबंदची हाक, सूर्या प्रकल्पातील ८० टक्के पाणी वसई-विरार, भार्इंदरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:30 AM2017-09-18T03:30:16+5:302017-09-18T03:30:20+5:30
सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पालघर : सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठा पाठिंबा मिळत आहे.
प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गाव-पाड्यातील घरांना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असताना राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे मिळविण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. त्याचा मोठा परिणाम तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनावर होणार असून त्यांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नाही. २६ गावे नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत असलेल्या सातपाटी, शिरगाव, धनसार, हरणवाडी, खारेकुरण इत्यादी गावसह मुरबे, डहाणू तील अनेक गावांना आठवड्यात फक्त एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा होत आहे. तर पालघर मुख्यालय व नवनगर लाही पाण्याचा पुरवठा होऊ शकेल की नाही ह्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.
डहाणू, कासा, पालघर, बोईसर, मनोर येथे झालेल्या बैठकींना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारच्या जिल्हा बंद बाबत प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, माकप, भूमिसेना, कुणबी सेना, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, शेतकरी संघर्ष समिती, ओबीसी हक्क परिषदेसह अन्य संघटनांनी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंद ला पाठिंबा दर्शविला आहे.