डहाणूच्या तीन ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:55 AM2018-02-27T01:55:56+5:302018-02-27T01:55:56+5:30

तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिकरीत्या सक्षम असलेल्या चिंचणी, चारोटी, दाभाडी या तीन ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून यासाठी महसूल तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

 Today's poll for Dahanu's three Gram Panchayats | डहाणूच्या तीन ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

डहाणूच्या तीन ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

googlenewsNext

डहाणू : तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिकरीत्या सक्षम असलेल्या चिंचणी, चारोटी, दाभाडी या तीन ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून यासाठी महसूल तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
२० हजार लोकसंख्या असलेल्या व एकूण १७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या चिंचणी ग्रामपंचात परिसरामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देऊन मतदार राजाला साद घातली आहे. १२९३० मतदार असलेल्या चिंचणी गावात एकूण ६ प्रभाग आहेत. त्यासाठी ७१ उमेदवार नशीब आजमावित आहेत. सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षाचे एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पंचवीस वर्षापासून चिंचणी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असून या ग्रा.पं. काबिज करण्यासाठी येथील कॉग्रेस, राष्टÑवादी-काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बहुजन विकास आघाडी, तसेच अपक्षाने जोरदार प्रचार केला आहे. एक, दोन उमेदवार वगळता या निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी तरूण चेह-यांना संधी दिली आहे. त्यामुळे निवडणूकीला जोरदार रंग चढून प्रत्येक प्रभागात चूरस निर्माण झाली आहे. आज मंगळवार रोजी मतदान होणार असून बुधवारी निकाल जाहिर होणार आहे.
चिंचणी, चारोटी, दाभाडी या तीन ग्रामपंचायतीमध्ये विकास योजनांबाबत अनेक प्रश्न मतदार उपस्थित करीत आहेत. सार्वजनिक शौचालये, गटारे, काचºयाने व घाणीने भरलेल्या कचरा कुंड्या मंगळवारी होणाºया मतदानामध्ये प्रभावी ठरणार आहेत. प्रभागात ग्रामस्थांना पूरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नाही. तरी पाण्याचे बील वसूल केले जात आहे. स्ट्रिट लाईटचा ठिकाणा नाही यामुळे जनता नाराज आहे. एकुणच या गावातील सुशिक्षित जनता मंगळवारी आपला कौल देऊन उमेदवारांचे भविष्य निश्चित करणार आहे.

Web Title:  Today's poll for Dahanu's three Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.