जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:24 AM2019-01-13T00:24:48+5:302019-01-13T00:24:53+5:30
मच्छीमारांचा संताप : प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणार
पालघर : उत्तन, वसई भागातील मच्छीमारांनी सागरी हद्दीत केलेले अतिक्र मण, पर्ससीन मच्छीमार बोटींची वाढती संख्या, मासळी मार्केट आदी सह अन्य प्रलंबित प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (१४ जानेवारी) दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
किनारपट्टीवर रूढी-परंपरे प्रमाणे लवादाने दिलेल्या निर्णया प्रमाणे मासेमारी करण्याची परंपरा राखली जात होती.मात्र वसई,उत्तनच्या मच्छीमारांनी लवादाच्या निर्णयाला न जुमानता समुद्रात आपल्या कवींचे क्षेत्र विस्तारल्याने १९८० साली समुद्रात मोठा संघर्ष झाला होता. ह्या संघर्षांनंतर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग अयशस्वी ठरल्याने जिल्हाधिकाºयाने वसई,उत्तन च्या मच्छीमाराना त्यांच्या काही क्षेत्रातील कवीची खुंट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या जिल्हाधिकाºयांच्या निर्णया विरोधात वसई आदी भागातील मच्छिमारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही कवी खुंट मारण्याचे क्षेत्र आता दिव-जाफराबाद पर्यंत पसरवीत नेण्यात आले आहे. त्यामुळे पालघर, डहाणू, दिव-दमण, जाफराबाद भागातील मच्छीमारांचे मासेमारी क्षेत्र घटले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनात घट होत त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे वाढत जात ते मेटाकुटीला आले आहेत.
तसेच, पर्ससीन नेट मासेमारीला बंदी असताना आजही छुप्या पद्धतीने मासेमारी सुरू आहे, मच्छिमारांना मागील काही वर्षांपासून न मिळालेला कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा मिळावा, मच्छीमारांच्या किनाºया लगतच्या घराच्या जमिनीचे सातबारे मिळण्यास होणारा विलंब तसेच मासे विक्र ी करणाºया महिलांना मासळी मार्केट साठी जागा उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण प्रशांच्या सोडवणुकी साठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनोर चार रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
घरोघरी संपर्क महिलांचा सहभाग मोठा
च्दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समिती चे अध्यक्ष अशोक अंभिरे, उपाध्यक्ष हितेश भाई मेस्त्री, सुभाष तामोरे, चिटणीस रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दमण ते उंबरगाव, डहाणू ते दांडी, नवापूर ते सातपाटी, वडराई ते दातीवरे असे चार भाग विभागण्यात आले असून प्रत्येक विभागातील घराघरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक घर आंदोलनात सहभागी होतील अशी व्यूहरचना केली आहे.