अणू उर्जाकेंद्रावर आज शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:05 PM2018-12-09T23:05:59+5:302018-12-09T23:07:15+5:30
खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना सचिव व महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचंड मोर्चा तारापूर अणू उर्जा केंद्रावर काढण्यात येणार आहे.
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्रामध्ये भूमिपुत्रांना नोकरभरतीमध्ये प्राधान्य द्यावे आणि इतर ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिय लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवसेना नेते व महासंघाचे अध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना सचिव व महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचंड मोर्चा तारापूर अणू उर्जा केंद्रावर काढण्यात येणार आहे.
देशाच्या विकासासाठी तारापूर अणुउर्जा प्रकल्प ३ व ४ उभारण्याकरीता सोन्यासारख्या जमिनी व घरे देणाऱ्या अक्करपट्टी व पोफरण येथील प्रकल्पग्रस्ताना तसेच परिसरातील प्रकल्प बाधितांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पात कायम स्वरूपी बरोबरच कंत्राटी पद्धतीवर पुरेसा रोजगार न देता डावलण्याचे येत आहे.
आतापर्यंत झालेल्या नोकरभरतीमध्ये केवळ १० टक्केच भूमिपुत्रांना प्रकल्पात नोकºया मिळाल्या असल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप खदखदत असून उरलेली ९० टक्के नोकरभरती कुणाच्या घशात घातली जाते याचा जाब विचारला जाणार असून किमान वेतन कायदा धाब्यावर बसवून कमी पगारात ठेकेदार काम करवून घेत आहेत, सीएसआर फंडातून आसपासच्या गावांचा विकास करण्याचाही पडलेला विसर व अन्य विविध मागण्यांसाठी काढण्यात येणाºया या विराट मोर्चामध्ये हजारो प्रकल्पग्रस्त, प्रकल्पबाधित आणि स्थानिक भूमिपुत्र सहभागी होणार असल्याचा विश्वास आयोजकांतर्फे व्यक्त केला जात आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.