रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 08:44 PM2024-05-29T20:44:08+5:302024-05-29T20:44:21+5:30

Vasai Virar News: वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती.

Toddler dies after drowning in resort's swimming pool, second tragedy in Vasai in a month | रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना

रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना

- मंगेश कराळे
नालासोपारा - वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकल्या मुलींचा मृत्यू होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे.

रानगाव समुद्रकिनार्‍यावर एचडी नावाचे रिसॉर्ट आहे. समीक्षा जाधव (७) ही चिमुकली आजीसह भांडुप येथे राहते. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने ती आजीसह या रिसॉर्टमध्ये आली होती. त्यांच्यासोबत अन्य १४ महिला होत्या. सकाळी सर्वजण स्विमिंग पुलमध्ये उतरले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवणासाठी बाहेर आले होते. तिची आजी आणि अन्य महिला जेवणाच्‍या रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी समीक्षा नजर चुकवून पुन्हा स्विमिंग पुलमध्ये गेली. मात्र पाण्यात ती बुडू लागली. ती ओरडू लागल्यानंतर तिच्याकडे लक्ष गेले. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तो पर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या प्रकरणी वसई पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सगळे जण जेवणाच्या रांगेत होते. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये जीवरक्षक होते. पंरतु जेवणाची वेळ असल्याने ते जागेवर नव्हते. खेळता खेळता समीधा स्विमिंग पुलमध्ये गेली आणि ही दुर्घटना घडली, असे वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले. समीधा ही आजीसोबत रहात होती. तिची आजी घरकाम करते. तिची आई तिला सोडून गेली असून वडील गावी राहतात. तिच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महिन्याभरातील दुसरी दुर्घटना
८ मे रोजी याच रानगावमध्ये असेलल्या रॉयल रिसॉर्टमध्ये रिद्धी उर्फ प्रांजल माळी (१०) या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वसई पोलिसांनी रिसॉर्ट मालकाच्या विरोधात कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Toddler dies after drowning in resort's swimming pool, second tragedy in Vasai in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.