गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल फ्री पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:02 AM2019-08-30T00:02:18+5:302019-08-30T00:02:27+5:30
भक्तांना दिलासा : गाडीची कागदपत्रे योग्य असल्यास पास मिळणार
विरार : भाविकांचा प्रवास अधिकाधिक सुखद व्हावा यासाठी प्रशासनाने कोकणात गणेश उत्सवाकरीता जाणाºया भाविकांच्या गाड्यांचा टोल मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
गणेश उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे तर गाव जाण्यासाठी देखील भाविक सज्ज झालेले आहे. गणेश उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर भाविकांची ये-जा सुरु असते. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक कोकणात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जातात तर टोल नाक्यावर भाविकांना वाट पहावी लागते. तसेच वाहनांची कोंडी होत राहते. तर उत्सवासाठी जाणाºया भाविकांना या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनातर्फेगणेश उत्सवासाठी जाणाºया भाविकांना टोल फ्री करून देण्यात येणार आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय मार्ग क्र मांक ४८ तसेच नाशिक जिल्ह्यातून येणारे गणेशभक्त यांना राष्ट्रीय महामार्ग क्र .३ वर टोल मोफत करण्यात येणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात म्हणजेच ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत प्रशासनातर्फे टोल मोफत करण्यात आलेला आहे. आपल्याजवळ असलेल्या वसई आर.टी.ओ कार्यालयात जाऊन टोल फ्री पास घेणे गरजेचे आवश्यक आहे.
आर.टी.ओ.कडून हा पास देण्यात येणार असून पास असल्याशिवाय टोल माफ केला जाणार नाही आहे. तसेच आर.टी.ओ. विभागात जाणे शक्य नसेल तर वाहतूक विभागात जाऊन हा पास घ्यायचा आहे. मोटर वाहन विभागाकडून गाडी नंबर, फोन नंबर या सर्वांचा तपास करण्यात येईल व गाडीची कागदपत्र योग्य असल्यास टोल फ्री पास देण्यात येईल.
यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मुंबई शहर, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या जिल्ह्यातून कोकणात जाणाºया भाविकांना हा पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे तर वसईकरांना टोल मोफत करण्यासाठीचा पास वसई आर.टी.ओ. कार्यालयात उपलब्ध होणार आहे.
मोटर वाहन विभागात पास उपलब्ध आहेत. पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे. वाहन मालकांनी गाडीचे कागदपत्र आणून पास घ्यायचे आहे. ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबर या दरम्यान पास वापरता येईल.
- अनिल पाटील,
अधिकारी, आर.टी.ओ, वसई