मुसळधार पावसाने पाणीप्रश्न सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:48 AM2020-08-18T00:48:39+5:302020-08-18T00:48:49+5:30
वसई तालुक्यात १३.१ मिमी, वाडा २२.४ मिमी, डहाणू १७.३ मिमी, पालघर १२.२ मिमी, जव्हार ४३.१ मिमी, मोखाडा ३९.९ मिमी, तलासरी २४.४ मिमी, तर विक्रमगड २१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात सोमवार सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने धरणे, नदी, नाले ओसंडून वाहतानाचे चित्र दिसत आहे. यामुळे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यात सरासरी ४४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात १३.१ मिमी, वाडा २२.४ मिमी, डहाणू १७.३ मिमी, पालघर १२.२ मिमी, जव्हार ४३.१ मिमी, मोखाडा ३९.९ मिमी, तलासरी २४.४ मिमी, तर विक्रमगड २१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सलग चांगला पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात आणि मुंबई, ठाणे भागात पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या धामणी, कवडास, वांद्री, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व कुर्झे धरण क्षेत्रात या आठवड्यात सलग चार-पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
सकाळी सात वाजता सूर्या धामणी धरण ९६.२२ टक्के तर कवडास व वांद्री धरण गेल्या आठवड्यातच १०० टक्के, तानसा ८६ टक्के, मोडक सागर ९६.२ टक्के, मध्य वैतरणा ८२.८९ टक्के आणि कुर्झे धरणाचा ९०.४० टक्के पाणीसाठा झाल्याने वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा व खरीप हंगामातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी साठवण क्षमता असलेले सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण ९६.२२ टक्के भरल्याने रविवारी धरणाचे तीन दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले होते. त्यामुळे ७२४१.३७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून सूर्या नदी काठावरील गावाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
>धामणी धरण : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आणल्या जात असलेल्या धामणी धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर आहे, तर येथील उपयुक्त पाण्याचा साठा २७६.३५० दलघमी इतका आहे. या धरणाची आजची पाण्याची पातळी ११७.७५ मीटर इतकी झाली असून धरणात २७४. ८७६ दलघमीपैकी उपयुक्त पाण्याचा साठा २६५.९१६ दलघमी असून धरण ९६.२२ टक्के भरले आहे. या धरण क्षेत्रात सोमवारी ५१.० मिमी पाऊस पडला आहे.
१ जूनपासून धरण क्षेत्रात आतापर्यंत १६८८.०० मिमी पाऊस झाला आहे.
>कवडास उन्नेयी धरण
कवडास उन्नेयी धरणाची पाणी साठवण्याच्या पातळीची पूर्ण क्षमता ६५.२५ मीटर इतकी असून ९.९६० दलघमी साठा आहे, धरणात आजची पाण्याची पातळी ६५.७५ मीटर इतकी असून पाण्याचा साठा १३.७०० दलघमी झाला आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ९.९६० दलघमी येथील टक्केवारी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के झाली आहे. या धरण क्षेत्रातदेखील सोमवारी ५२.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात १ जूनपासून १६३७.०० मिमी पाऊस झाला असून धरणाच्या सांडव्यातून ४९०६.६७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
>वांद्री धरण
जिल्ह्यात पालघर व वाडा तालुक्याच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या वांद्री धरणाची पाणी साठविण्याची पातळी क्षमता ४३.६० मीटर असून या धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ३५.९३८ दलघमी इतका आहे. धरणातील आजची पाण्याची पातळी ४३.८८ मीटर एवढी आहे, तर पाण्याचा आजचा साठा ३७.१०८ मीटर आहे. या धरणातील उपयुक्त साठा ३५.९३८दलघमी असून धरण १०० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात २६.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून या धरण क्षेत्रात २१४६.०० मिमी पाऊस झाला असून ५२३.६४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
>तानसा धरण
तानसा धरणाची पाणी साठविण्याच्या पातळीची पूर्ण क्षमता १२८.६ मीटर इतकी असून १८४.६० दलघमी साठा आहे. धरणात आजची पाण्याची पातळी १२७.२४८ मीटर इतकी असून पाण्याचा साठा १९८.५२ दलघमी झाला आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १५८.७६० दलघमी असून येथील टक्केवारी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८६ टक्के झाली आहे. या धरण क्षेत्रात देखील सोमवारी १६.०० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या परिसरात
१ जूनपासून १३७९.०० मिमी पाऊस झाला आहे.
>मोडकसागर धरण
मोडक सागर धरणाची पाणी साठविण्याच्या पातळीची पूर्ण क्षमता १६३.२ मीटर इतकी असून २०५.६८ दलघमी साठा आहे. धरणात सोमवारी पाण्याची पातळी १६२.२०८ मीटर इतकी असून पाण्याचा साठा २७३.८० दलघमी झाला आहे, त्यातील उपयुक्त पाणीसाठा १९७.५०० दलघमी येथील टक्केवारी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८६ टक्के झाली आहे. या धरण क्षेत्रात देखील सोमवारी ३५.०० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या परिसरात १ जूनपासून १६४८.०० पाऊस झाला आहे.
>मध्य वैतरणा धरण : मध्य वैतरणा धरणाची पाणी साठविण्याच्या पातळीची पूर्ण क्षमता २८५.०० मीटर इतकी असून २०२.१० दलघमी साठा आहे. धरणात सोमवारी पाण्याची पातळी २८०.६५० मीटर इतकी असून पाण्याचा साठा १७६.०९५ दलघमी झाला आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १६७.५२५ दलघमी आहे. या धरण क्षेत्रातदेखील सोमवारी ५६.०० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या परिसरात १ जूनपासून १८०१.०० पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन नद्यांमध्ये सूर्या, वैतरणा व पिंजाळ या नद्यांच्या समावेश असून सोमवारी सूर्या नदीची पाणी पातळी ५.३० मीटरवर होती. या नदीच्या पाण्याच्या पातळीचा इशारा ११ मीटरचा असून धोक्याची पातळी १२.१० मीटरवर आहे, तर वैतरणा नदीची पाणी पातळी १००.५५ मीटर असून या नदीच्या पाण्याची इशारा पातळी १०१.१० मीटर आहे तसेच तिची धोक्याची पातळी १०२.१० मीटर आहे. वाडा तालुक्यातून वाहत जाणाऱ्या पिंजाळ नदीची पाणी पातळी १००.७० मीटर असून तिची इशारा पातळी १०२.७५ मीटर इतकी असून धोका पातळी १०२.९५ मीटर आहे.
>कुर्झे धरण
कुर्झे धरणाची च्पाण्याची पातळी ७०.४० मीटर इतकी असून पाण्याचा उपयुक्त साठा ३९.०५ दलघमी आहे. धरणातील आजची पाण्याची पातळी ६८.७० मीटर आहे, तर आजचा पाणीसाठा ३८.२८ दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा ३६.६०० दलघमी आहे. या धरणात आजपर्यंत ९०.४० टक्के पाणी साठले आहे, तर सोमवारी धरण क्षेत्रात १०.०० मिमी पाऊस पडला आहे. १ जूनपासून या धरण क्षेत्रात ९६०.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.