वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण २० लाख ८६ हजार ३४० लसीचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:48 PM2022-01-03T16:48:09+5:302022-01-03T16:48:28+5:30
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.२ जानेवारी २०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतकं लसीकरण वाटप
आशिष राणे, वसई
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.२ जानेवारी २०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतकं लसीकरण वाटप झाल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं 'लोकमत'ला दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण विविध ठिकाणी सुरू आहे जसा शासनाकडून लसीचा साठा येतो तो अभ्यासपूर्ण शहरातील विविध लसीकरण केंद्र निहाय पाठवला जातो .
दरम्यान दि.१६ जानेवारी २०२१ ते दि. २ जानेवारी २०२२ रोजी पर्यंत आजवर वसई विरार शहरांतील विविध लसीकरण केंद्रावर शहरांतील १२ विविध प्रकारच्या सेवार्थ लाभार्थ्यांना एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतके ( डोस ) कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या या आकडेवारीत १२ विविध सेवा बजावणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. तो खालीलप्रमाणे,
हेल्थकेअर वर्कर (पहिला डोस ) : १३४९१
हेल्थकेअर वर्कर (दुसरा डोस) : १२५९६
फ्रंटलाइन वर्कर (पहिला डोस ) : १४४८६
फ्रंट लाईन वर्कर (दुसरा डोस ) : १३५०२
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस) : ५७४४८१
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस): ५२१५४९
४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (पहिला डोस) : ३९३४४९
४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती (दुसरा डोस): २४३७५८
६० वर्षावरील व्यक्ती (पहिला डोस ) : १६४०६१
६० वर्षावरील व्यक्ती ( दुसरा डोस ) : १३१४३७
गरोदर महिला (पहिला डोस ): २९३०
गरोदर महिला (दुसरा डोस ) : ६००