निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:49 AM2017-12-30T02:49:29+5:302017-12-30T02:49:33+5:30

वाडा तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Tournament of hot tubes in the bottom! | निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

Next

वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या झ-यांचे, कुंडांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. श्री क्षेत्र अकलोली, वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे जगप्रसिद्ध गरम पाण्याचे झरे (कुंडे) असून श्री नित्यानंद महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. तर श्री रेणुका, वज्रेश्वरी व कालिका देविंचे येथे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे नित्यानंद बाबा व देवता यांचे देश विदेशातील भक्तगण येथे येत असतात. त्यामुळे भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. या क्षेत्राला लागूनच निंबवली हे छोटेसे खेडेगाव असून या गावातही गरम पाण्याचे झरे आहेत. या कुंडावर अंघोळ करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात. यातील एक कुंड अति गरम तर दोन कुंडे सौम्य स्वरूपाची आहेत. अशी तीन कुंडे येथे आहेत. कुंडाचे पाणी हे गंधकमिश्रीत असल्याने त्यात अंघोळ केल्याने अनेक रोग व्याधी ब-या होतात . त्यामुळे अनेक रोगबाधित रूग्ण आवर्जून येथे अंघोळीसाठी येऊन रोगमुक्त होत असतात. तसेच जगभरात कुठेही भूकंप झाला तर या कुंडातील पाण्याची पातळी वाढते व ती अति गरम होतात किंवा भूकंप होण्याअगोदरही येथे बदल जाणवत असतो. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
येथे तीन कुंडे असून ती जशी पूर्वी आहेत तशीच आजही आहेत. महिलांसाठी असलेल्या कुंडासभोवत एका दानशूर व्यक्तीने पत्र्याचा निवारा उभारला आहे बाकी कुंडे पूर्वीपासून आहेत तशीच आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळाचा दर्जा या गावाला दिल्यास विशेष निधी येऊन कुंडांचे सुशोभिकरण होईल व पर्यटक वाढतील अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Tournament of hot tubes in the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.