शोभायात्रेत परंपरा अन् संस्कृतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:52 AM2019-04-07T00:52:11+5:302019-04-07T00:52:26+5:30

जिल्ह्यामध्ये गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत: अनेक ठिकाणी आकर्षक पारितोषिके, तरुणाईचा उत्साह शिगेला, विविध कलांचे दर्शन

The tradition of tradition and culture in Shobhayatra | शोभायात्रेत परंपरा अन् संस्कृतीचे दर्शन

शोभायात्रेत परंपरा अन् संस्कृतीचे दर्शन

googlenewsNext

पालघर/वसई : रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. विजय आणि आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घरोघरी उंच गुढ्या उभारण्यात येतात. याच दिवशी शालीवाहन शकही सुरू झाले. शालीवाहनानेही याच दिवशी शत्रुवर अंतिम विजय मिळवला होता. असा हा गुढीपाडवा शनिवारी पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी व वसई-विरारमधील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने अनेक ठिकाणी सकाळी व संध्याकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


वसई विरारमध्ये विविध सामाजिक संघटनांतर्फे दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. गेल्या काही वर्षापासून वसईत पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर तरु णाई, ढोल, ताशांच्या गजरात थिरकणारी पावले, ऐतिहासिक प्रसंग दाखिवणारी शोभायात्रा, साहसी खेळांचे प्रात्यिक्षके, नऊवारी साडयÞा नेसून दुचाकीवर निघालेल्या महिला, विविध कलाविष्कारांची जुगलबंदी पहायला मिळते. वसईत मोठ्यÞा धूमधडाक्यात हिंदू नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा साजरा करण्यात येत असतो. मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन यानिमित्ताने वसईकरांना घडत असते. तालुक्यातील विरार पुर्व मनवेलपाडा, बोळींज, आगाशी, नाळा, नालासोपारा, नवघर पुर्व, वसई पश्चिम,पारनाका, रमेदी या भागांमध्ये नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या होत्या.


लेझीम पथक, वारकरी पथक, टिपरी पथक तसेच सांस्कृतिक कार्यक्र म यावेळी सादर केले गेले. नाळा येथे सोमवंशी क्षित्रय समाजातर्फे शोभायात्रा कढण्यात आली होती.

विक्रमगड : नवरंग मित्र मंडळच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ६ मार्च गुढीपाडव्या पासून ते १३ एप्रिल रामनवमी दरम्यान महिलांकडुन चैत्र नवरात्सव साजरा केला जात असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ तालुक्यातील पुर्वापार एकमेव सार्वजनिक नवरंग मित्र मंडळ विक्रमगड पंचक्रोषितील ग्रामदेवता श्री आंबा माता देवीचा मुळ चैत्र नवरात्रौत्सव वर्ष २०१० पासून साजरा होतो. या मंडळाच्या वतीने महिलांच्या सहभागाने अविरतपणे हा उत्सव सुरु आहे. तालुक्यातील गाव, खेडया पाडयातील हजारो भावीकांचे श्रध्दस्थान असलेल्या देवीसमोर हा नवरात्रौत्सव जल्लोशात साजरा केला जातो. अष्टमीच्या दिवशी होम हवन, अभिषेक तर दैनंदिन पुजा आर्चा, प्रसाद व नैवेद्य असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आलेले आहे़ या मंडळाच्या नव्या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष- संतोष भानुषाली, मुख्य व्यवस्थापक-महेष आळशी यांच्या मार्गदर्षनाखाली उत्सवाचे आयोजन मंडळाकडुन करण्यात आलेले आहे़

वाडा : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा वाडा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरात नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व ढोलताश्यांच्या गजरात या शोभायात्रेत पारंपारिक पोशाख परिधान करून आबालवृद्ध सहभागी झाले होते. घरोघरी गुढ्या उभारुन त्यांचे पुजन करण्यात आले. नववर्ष स्वागत समिती वाडा शहराच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेची सुरु वात श्रीराम मंदिर येथून करण्यात आली. पुढे भानुशाली आळी, परळी नाका, बस स्टँड, विठ्ठल मंदिर, गुडलक यंग क्लब, गावदेवी मंदिर व पुन्हा श्रीराम मंदिर येथे येऊन गुढी उभारली व या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यामध्ये पुरु ष व महिलांचे ढोल पथक, पी. जे. हायस्कूलच्या विद्यार्थींनींचे लेझीम पथक, वारकरी, महापुरु षांच्या वेशात चिमुकले सहभागी झाले होते.

वसई : येथील साईनगर मध्ये सालाबाद प्रमाणे गुढीपाडवा व हिंदू नववर्ष दिन शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी साईनगर व इतरत्र भागातील हजारो नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून या शोभायात्रेत आनंदाने सहभाग घेतला. दरम्यान यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने साईनगर येथील रहिवाशांनी मिळून गुढीपाडवा उत्सव समितीच्या माध्यमातून नवघर माणिकपूर शहरात एक भव्य शोभायात्रा काढली. याद्वारे शांतीचा व सर्वधर्मभावाचा संदेश देण्यात आला. नायगांव पूर्वेकडील जूचंद्र येथे सकाळी ७:३० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. जंजिरे वसई किल्ल्यातील दर्या बुरु जावर दुर्गमित्रांनी गुढी उभारली. गेली १६ वर्ष दुर्गमित्र वसई किल्ल्यातर् गुढीपाडव्याला बुरूजावर पुजन करून विजयाची गुढी उभारत असतात.

Web Title: The tradition of tradition and culture in Shobhayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.