नारंगी गावचा पारंपरिक होळी उत्सव, आधुनिक काळातही तरुणाईला परंपरेची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:42 AM2018-03-03T02:42:47+5:302018-03-03T02:42:47+5:30

विरार पश्चिमेकडील नारंगी गावात आजही पारंपारिक पध्दतीने संपुर्ण गाव एकत्र येऊन होळीचा सण साजरा करतो.

Traditional Holi festival of orange village, the trend of youth tradition in modern times too | नारंगी गावचा पारंपरिक होळी उत्सव, आधुनिक काळातही तरुणाईला परंपरेची ओढ

नारंगी गावचा पारंपरिक होळी उत्सव, आधुनिक काळातही तरुणाईला परंपरेची ओढ

googlenewsNext

वसई : विरार पश्चिमेकडील नारंगी गावात आजही पारंपारिक पध्दतीने संपुर्ण गाव एकत्र येऊन होळीचा सण साजरा करतो. गावातील पाटलाच्या मानाच्या होळीपासून नवसाच्या होळी पर्यंत अशा पाच होळी एकत्र आणून त्या रात्री दहा वाजता उभ्या केल्या जातात. बारा वाजता त्याची पुजा करु न, दुसºया दिवसी सकाळी त्या पेटविल्या जातात.
विरार पश्चिमेला नारंगी गावचा होळीचा सण या अतिशय महत्वाचा सण मानला जातो. लहान मुलांपासुन वयोवृध्दा पर्यंत होळीच्या सणाला प्रत्येकजण सहभागी होतात. सायंकाळी सात वाजल्या पासुन खंद्यावर वेगवेगळ्या ठिकाणावून होळीचे झाड आणले जाते, त्यानंतर गावातील पाटलाला या होळीचा पहिला मान दिल्या जातो. पाटलाच्या मानाची आणी नवसाच्या चार अशा पाच होळीचे झाड खांद्यावर घेऊन गावातुन फेरी मारली जाते. नंतर सार्वजनीक मैदानावर गावाच्या साक्षीने तिची पुजा-आर्चा करु न त्या एकामागुन एक ऊभ्या केल्या जातात.
रात्री बारा वाजता गावातील नवविवाहीत जोडपे पारंपारिक पद्धतीने होलीका देवीची पूजा करुन मराठी, हिंदी, आणी पारंपारिक गाण्यावर ताल धरत नाचतात. या गावातील आग्री, वैती व कोळी नागरिकांचा हा अतिशय आनंदाचा सण असून या ठिकाणी सर्व जण एकोप्याने हा सण साजरा करतात. सध्या गावाची लोकसंख्या पाच हजाराच्यावर असून आधुनिकतेची कास सर्वांनीच स्विकारली असलीतरी आपली गावकी सांभाळतांना गावकरी एकत्र येऊन फेर धरतात हेच महत्वाचे.
>फाका अन् गावकीची परंपरा
पारोळ : सिमगट सिमगट टोतेरा आज काय आमचा भालेरा, अबय शाबय दे पैसा, अश्या फाका करत गावकी जपत पारंपारीक पध्दतीने सिमगा साजरा करण्यात आला. होळीच्या दिवशी वसई पूर्व भागातील प्रत्येक गावातील तरु ण जंगलात जाऊन सूकी लाकडे घेऊन येतात. होळीचा मान असलेला व्यक्ती जंगलात जाऊन बांबू ची होळी घेऊन येतात. या होळीची पोलीस पाटलाच्या हातून पूजा झाल्यावर पूरणपोळी, ऊस, तांदळाची पापडी, साखर गाठी, गावातील सुवासीनी होळी ला अर्पण करून ती पेटवली जाते. या भोवती फेरा धरण्याचा मान नवदापत्याला असतो. तर गावतील तरु ण मूल आज ही खोके, पतरे, घमेली आदी साहित्य वाजवून आनंद साजरा करून शिमगा साजरा करतात. आता शिमगोत्सवाला अधुनिकतेचा साज चढल्याने नावाने होळी पेटवताना देण्यात येणाºया फाका बंद झाला असून सरपणाची कमतरता, आधुनिक जिवनशैलीमुळे तरुणाईचे परंपरेकडे होणारे दुर्लक्ष, होळीसाठी लागणाºय वस्तूंचे वाढते दर यामूळे शिमग्याचा उत्साह कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जुने जाणते गावकरी यामुळे चिंता व्यक्त करतात.
>वस्ती व नाक्यानाक्यावर रंगाची उधळण ; पुरणपोळीचा नैवेद्य अन् पारंपारिक साज
बोर्डी : तालुक्यात मोठ्या उत्साहात होळी आणि धूळवड साजरी झाली. गुरु वारी होळकरांनी लाकडे रचून सजावट केलेली होळी रात्री पेटवण्यात आली. या वेळी नटून थटून आलेल्या महिलांनी पुरणपोळी व नारळ अर्पण करून पूजन केले. धुळवडीला रंगांची उधळण करणारी लहान मुुलांचे गट वस्ती व नाक्यावरून फिरताना दिसले.
नवजोडप्यांच्या हस्ते नारळ अर्पण
किनारपट्टीच्या गावांमध्ये होळीला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. चिखले गावातील गावड भंडारी समाजात नववधूला पहिल्या होळी सणाला माहेरी बोलावून वाजतगाजत होळीला नारळ अर्पण करण्यासाठी घेऊन येतात.
मृतात्म्याच्या स्वर्ग प्राप्तीसाठी प्रार्थना
ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन होऊन वर्ष झाले आहे. त्यांच्या नातेवाईकांना धुळवडीच्या दिवशी आमंत्रित करुन भरु डाच्या माध्यमातून मृतात्मा स्वर्गलोकी सुखरूप पोहचला असून आप्तांना आजपासून त्याची चिंता होळीच्या चितेत दहन व्हावी अशी प्रार्थना केली जाते.
आदिवासी समाजात कैरी खाऊन साजरा
ंदिवाळीला जशी चवळी खाल्ली जाते, तसं धुळवाडीच्या दिवशी कुलदैवताला कैरीचा नैवेद्य दिला जातो. हा प्रसाद आप्तेष्टांना वाटण्यात
आला. त्यानंतर कैरीचा समावेश स्वयंपाकात करून सामूहिक जेवणाचा आस्वाद लुटण्यात आला.

Web Title: Traditional Holi festival of orange village, the trend of youth tradition in modern times too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.