महसूलकडून तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज ठेवला टेबलावर, माजी आमदार, जि.प. अध्यक्षांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:27 AM2018-01-29T06:27:46+5:302018-01-29T06:28:19+5:30
महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.
वसई : महसूल खात्याने प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या झेंडावंदन समारंभात तिरंगा चक्क टेबलावर ठेवल्याने तिरंग्यांचा अवमान झाल्याची तक्रार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वसईत महसूल खात्याने तहसिल आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबन नाईक सालाबादप्रमाणे यंदाही झेंडावंदनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी झेंडावंदनापूर्वी दोन्ही ठिकाणी झेंडे एका टेबलावर ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब घोन्सालवीस आणि नाईक यांनी तात्काळ तहसिलदार किरण सुरवसे आणि प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी दोघांनीही याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन कळवतो, असे उत्तर दिले.
कायद्यानुसार तिरंगा झेंडा गुंडाळून आडवा ठेवण्यास मनाई आहे. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांपासून तहसिल कचेरीसमोर झेंडावंदनाआधी तिरंगा टेबलावर आडवा ठेवण्यात येत आहे. प्रत्येकवेळी आम्ही तक्रार करतो तेंव्हा अधिकारी माहिती घेऊन सांगतो इतकेच उत्तर देतात. यंदाही याप्रकाराची पुनवृत्ती झाल्याने तक्रार केली. अधिकारी कर्मचाºयांना नियम आणि ध्वजसंहितेची माहिती नसल्याने असा प्रकार सुरु आहे. तो थांबला पाहिजे इतकीच अपेक्षा आहे., असे घोन्सालवीस यांनी सांगितले. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शनिवारी सुट्टी असल्याने प्रांताधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क होऊ शकला नाही.