समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या २ भावांचा दुर्दैवी मृत्यू; गावात पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:01 AM2022-07-12T11:01:12+5:302022-07-12T11:01:39+5:30

मागील आठवडा भरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Tragic death of 2 brothers who went fishing in the sea at palghar | समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या २ भावांचा दुर्दैवी मृत्यू; गावात पसरली शोककळा

समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या २ भावांचा दुर्दैवी मृत्यू; गावात पसरली शोककळा

Next

पालघर - समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बहाडच्या गोपाळ मडवे आणि वसंत राऊत ह्या दोन मच्छिमार सोमवारी मासेमारी साठी खाडीत गेले असताना बेपत्ता झाले होते. त्याचा शोध करणाऱ्यांना डहाणू तालुक्यातील नाकरखाडीमध्ये त्याचे मृतदेह आढळून आले आहेत.

सोमवारी  11/07/2022 रोजी सकाळी 11:00 वाजता डहाणू तालुक्यातील बहाडच्या गोपाळ मडवे आणि वसंत राऊत हे दोन्ही मच्छिमार खाडीत मासेमारीला गेले होते.मात्र अनेक तास वाट पाहुणही  त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने स्थानिकांनी शोध मोहीम सुरू केली होती. मागील आठवडा भरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत असून एका बाजूला समुद्राची भरती तर दुसरी कडे मुसळधार पाऊस ह्यामुळे समुद्रात मोठा प्रवाह निर्माण झाल्याने ह्या दोन्ही मच्छीमारांचा त्या प्रवाहात सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असावा असा तर्क व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांच्या शोध मोहिमेला मंगळवारी यश आले असून त्याचे सकाळी त्यांचे मृतदेह बहाड गावच्या हद्दीत नाकरखाडी  येथे किनाऱ्यावर आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी  पोलिसांना सूचित केले असून पोलिसांना ग्रामस्थानी सूचित केले आहे

Read in English

Web Title: Tragic death of 2 brothers who went fishing in the sea at palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.