आसाम कार्यशाळेत पालघरच्या तीन शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण
By Admin | Published: February 21, 2017 05:08 AM2017-02-21T05:08:02+5:302017-02-21T05:08:02+5:30
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनात शाळांची भूमिका या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण पालघर
सफाळे : नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनात शाळांची भूमिका या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण पालघर जिल्हातील तिघा शिक्षकांना देण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये भारताचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची वृत्ती निर्माण व्हावी तसेच, विविध उपक्र मांतून त्याचे संवर्धन व संरक्षण व्हावे या संदर्भातील विषेश मार्गदर्शन व कृती कार्यक्रम त्यांच्या कडून करुन घेण्यात आला आहे.
दिल्लीच्या सी.सी.आर.टी.ने आसाम राज्यातील गौहत्ती येथे दि. ६ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजिलेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील १० शिक्षकांपैकी पालघर जिल्ह्यातील जतिन कदम, राजगुरु पंडित विद्यालय, (सफाळे)े, प्रतिभा क्षीरसागर-कदम जि.प. पळे बोरीपाडा, (डहाण)ू आणि प्रवीण पाटील, अ.ज.म्हात्रे विद्यालय नरपड, (डहाणू) यांचा समावेश होता. प्रशिक्षण दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण असल्याने महाराष्ट्रातील अधिकाधिक शिक्षकांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन सी.सी.आर.टी.चे व्यवस्थापक डॉ उत्पल शर्मा यांनी केले आहे. हे प्रशिक्षण डॉ.संदीप शर्मा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. शेवटी औरंगाबादच्या अंजली चिंचोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय पातळीवरील या सांगता समारंभाचे इंग्रजी सूत्रसंचालन महाराष्ट्रातर्फे प्रतिभा क्षीरसागर-कदम व हरियाणाचे नवरतन पांडे यांनी केले. (वार्ताहर)