व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:40 AM2017-11-25T02:40:47+5:302017-11-25T02:41:27+5:30
पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत.
पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. या निषेधार्थ मनसे कडून शुक्रवारी पालघर मधील सर्व बँकांना भेटी देत त्यांच्या शाखेतील कार्यालयीन कामकाज व नामफलक मराठीत करणे बाबत निवेदन देण्यात आले.
भारतीय अर्थमंत्रालयाच्या २४ एप्रिल २०१४ च्या निर्देशानुसार रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया ने सर्व बँकांमधील व्यवहार, योजनांची माहिती, इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेतून देणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही बँकांत हिंदी भाषेचा आग्रह धरण्यात येत असल्याच्या तक्र ारी नंतर महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत दिला होता. या पाशर््वभूमीवर शुक्रवारी पालघर मधील सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना मनसे कडून निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष मेस्त्री आणि शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या कडून सर्व व्यवस्थाकांना निवेदन देण्यात आलले. सोबत उदय माने, अमति उलकंदे, रत्नदीप पाखरे आदी उपस्थित होते.