वसई-विरार पालिकेतील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:25 PM2019-08-03T22:25:03+5:302019-08-03T22:25:14+5:30
प्रभारी सहायक आयुक्तांची संख्या अधिक
- आशिष राणे
वसई : वसई-विरार महापालिकेतील ९ अधिकाऱ्यांच्या शक्रवारी बदल्या करण्यात आल्या. उचलबांगडी करण्यात आलेल्या अधिकाºयांंमध्ये बहुसंख्येने प्रभाग समितीतील प्रभारी सहायक आयुक्तांची संख्या अधिक आहे. प्रशासकीय कामकाजाच्यादृष्टीने या अधिकाºयांंच्या बदल्या करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी ‘लोकमत’ला दिले. दरम्यान, या बदल्या झालेल्यांमध्ये मुख्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेले प्रशांत चौधरी यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून ‘जी’ प्रभाग समितीत पाठवण्यात आले आहे.
तर प्रभारी सहायक आयुक्त म्हणून मुख्यालयात माहिती अधिकार खात्यात असलेल्या दीपाली ठाकूर यांना धानिव/पेल्हार प्रभाग समिती ‘एफ’ प्रभागात प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षण विभागातील अंबादास सरवदे यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून चंदनसार ‘सी’ प्रभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर विकास पाडवी हे नालासोपारा (पू.) प्रभाग समिती ‘ड’मध्ये प्र. लेखापाल होते, त्यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून प्रभाग समिती ‘आय’ वसई कार्यलयाचा कार्यभार देण्यात आला आहे. धानीव/पेल्हार ‘एफ’ प्रभाग समितीच्या प्रभारी सहायक आयुक्तपदी असलेल्या दीपक म्हात्रे यांची उचलबांगडी करून त्यांना मुख्यालयातील जाहिरात कर विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सुभाष जाधव यांचीही उचलबांगडी केली असून, त्यांना वृक्षप्राधिकरण विभागात लिपीक म्हणून नियुक्ती केली आहे.
सुभाष जाधव वालिव ‘जी’ प्रभागात प्रभारी सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. याशिवाय प्रमोद चव्हाण आणि मनोज वनमाळी यांचीही बदली झाली आहे. चव्हाण चंदनसार ‘सी’ प्रभाग समितीच्या प्रभारी सहायक आयुक्तपदी होते. आता त्यांची रवानगी प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर स्थानिक संस्था कर विभागात करण्यात आली आहे.
तर मनोज वनमाळी प्रभारी सहायक आयुक्त म्हणून वसई ‘आय’ प्रभाग समितीचा कारभार पाहत होते. आता ते नालासोपारा (पूर्व), प्रभाग समिती ‘ड’ प्रभागात प्रभारी लेखापाल म्हणून काम पाहणार आहेत.
पालिका आयुक्तांची सक्त ताकीद !
या बदल्या पहिल्या टप्प्यातील आहेत. अधिकारी व कर्मचाºयांनी ताबडतोब पदभार न स्वीकारल्यास किंवा रजेवर गेल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त बी जी पवार यांनी दिला आहे.
२०० कर्मचाºयांच्या बदलीचे संकेत !
पालिका आयुक्त म्हणून पवार रूजू झाल्यानंतर ही पहिलीच खांदेपालट असून महापालिका प्रशासनाकडून अजूनही वर्षोनुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून बसणाºया आणि इतर अशा २०० कर्मचाºयांच्या बदल्या लवकरच करण्यात येणार आहे.