वसई-विरार मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:39 PM2024-03-21T12:39:39+5:302024-03-21T12:39:53+5:30
या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.
नालासोपारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्याच्या विविध महापालिकेतील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि ३५ उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये वसई-विरारमधील एक अतिरिक्त आयुक्त आणि सहा उपायुक्तांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक आयोगाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी नगरविकास खात्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि ३५ उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये वसई-विरारमधील सहा उपायुक्तांचा समावेश आहे.
यांच्या झाल्या बदल्या
अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त संघमित्रा खिल्लारे (अतिक्रमण), डॉ. चारुशीला पंडित (घनकचरा), उपायुक्त डॉ. विजय द्वासे (परिमंडळ प्रमुख), उपायुक्त पंकज पाटील (क्रीडा), उपायुक्त तानाजी नरळे (पाणीपुरवठा) आणि उपायुक्त नयना ससाणे (वृक्ष प्राधिकरण) आदींचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.