ट्रान्सफार्मर बिघाडला लोडशेडिंग

By admin | Published: July 7, 2017 06:04 AM2017-07-07T06:04:53+5:302017-07-07T06:04:53+5:30

तारापूर एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या १३२/१३३ के.व्ही. उपकेंद्र एक मधील पन्नास मेगा व्होल्ट अँपियर (एम.व्ही.ए) क्षमतेच्या

Transformer buggy loadshading | ट्रान्सफार्मर बिघाडला लोडशेडिंग

ट्रान्सफार्मर बिघाडला लोडशेडिंग

Next

पंकज राऊत/ लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर: तारापूर एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या १३२/१३३ के.व्ही. उपकेंद्र एक मधील पन्नास मेगा व्होल्ट अँपियर (एम.व्ही.ए) क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमध्ये बुधवार रात्री १०:३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एमआयडीसीतील उद्योगांसह हजारो वीजग्राहकांच्या वीजपुरवठयावर गंभीर परिणाम झाला असून अनेक भागात भारनियमन सुरु झाले आहे. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्यास आठवडा लागणार आहे
नादुरूस्त झालेल्या ट्रान्सफार्मर मधून ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या एमआयडीसीमधील एन झोन मध्ये 2 , कॉन्टेसा हॉटेल च्या मागे २, देदाल्याला एक तसेच ३ फिडर हायटेक्शन वीजग्राहकाचे ३ फिडर अशा एकूण आठ फिडरला वीजपुरवठा होत असल्याने त्यावरील हजारो वीजग्राहकांना झळ सोसवी लागणार आहे तर एवढया मोठया भागाला वीजपुरवठा करतांना वीज वितरणासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे.
घटनास्थळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. डोंगरे व महापारेषण कंपनीच्या टेस्टिंग विभागाच्या टीमने गुरुवारी सकाळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
हा ट्रान्सफॉर्मर बदलण्यास किमान पाच ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्याने त्याच्या वीजपुरवठ्याचा लोड इतर ट्रान्सफॉर्मरवर टाकण्याचे काम सुरु केले आहे.
याच उपकेंद्रत ५० एमव्हीए क्षमतेचा अन्य ट्रान्सफॉर्मर असून दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या १०० एमव्हीए क्षमते पैकी ६० एमव्हीएचा लोड फक्त एमआयडीसीचा तर उर्वरित १३ एमव्हीएचा लोड बोईसरसह चिंचणी, वरोर, वाणगाव, नांदगाव, शिवाजीनगर या ग्रामीण भागाचा आहे. या ७३ एमव्हीए पैकी ४७ एमव्हीए लोड शेजारच्या ट्रान्सफॉर्मर वर डायव्हर्ट केला असून्
ा १५ एमव्हीए लोड खैरापाडा येथील २२०/१३२/३३ के .व्ही. क्षमतेच्या उप केंद्रात वळविण्यात आला आहे त्यामुळे बराच प्रश्न मार्गी लागला तरी उर्वरित ११ एमव्हीए लोड करिता भारनियमन करावे लागणार आह.े त्याची झळ वरोर, वाणगांव, नांदगांव,चिंचणी , शिवाजीनगर (सालवड), एमआयडीसीमधील हाय टेन्शन वीज ग्राहक, तसेच बोईसर मधील ओस्तवाल अमेया पार्क ,नवापूर नाका, स्टेशन परिसर, सरावली ओस पाडा, इत्यादी ठिकाणच्या वीज ग्राहकाना बसणार असून उद्या पर्यंत हा ११ एमव्हीए सुद्धा खैरापाड्यावर डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत.

लोड केला डायव्हर्ट
औद्योगिक क्षेत्रातील रात्री वीजपुरवठा बंद करून नागरी वीजपुरवठा करण्यात येणार आहे तर दिवसा ग्रामीण भागात ८ ते १० तासचे लोडशेडींग होईल लोड डायव्हर्ट युद्ध पातळीवर सुरु आहे .

ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची झळ वीज ग्राहकांना कमीत कमी बसावी या करिता इतर ट्रान्सफॉर्मर वर लोड डायव्हर्ट करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येईल.
-दीपक पाटील,
अधीक्षक अभियंता, पालघर

Web Title: Transformer buggy loadshading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.