विनवळ शाळेच्या आवारात ट्रान्सफॉर्मर
By Admin | Published: January 5, 2017 05:27 AM2017-01-05T05:27:08+5:302017-01-05T05:27:08+5:30
तालुक्यातील विनवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. दरम्यान, त्या भोवती कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने व
जव्हार : तालुक्यातील विनवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. दरम्यान, त्या भोवती कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने व त्यातुन निघणाऱ्या तारा उच्च विद्युत प्रवाहीत असल्याने मधल्या सुट्टीमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका वाढला आहे.
ही धोकादायक स्थिती मुख्यध्यापकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी महावितरणकडे वारंवार मांडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्योचे शिक्षकांनी सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरच हा ट्रान्सफॉर्मर हटवणार का? असा सवाल शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष चंदर सोनावणे यांनीविचारला आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून ६६ मुलं आणि १०० मुली शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सहा ते सात महिन्यापूर्वी शाळेच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट होवून तो जळाला देखील होता. (वार्ताहर)