रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; साडेनऊ लाखांची दारू जप्त; भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 07:29 AM2023-12-17T07:29:51+5:302023-12-17T07:29:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दमणहून मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर ...

Transport of alcohol by ambulance; Liquor worth nine and a half lakhs seized; Bharari squad action | रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; साडेनऊ लाखांची दारू जप्त; भरारी पथकाची कारवाई

रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; साडेनऊ लाखांची दारू जप्त; भरारी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दमणहून मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर उभी होती. गुरुवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात छुप्या पद्धतीने दारूचा साठा आढळला. 

भरारी पथकाने कारवाई करत दारूचा साठा, रुग्णवाहिकेसह ९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रुग्णवाहिकेतून दमण बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असल्याबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सकाळी ९ वाजता वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर सापळा रचला. यात रुग्णवाहिकेत विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यांमध्ये दमण बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

दारू वाहतूक कशा पद्धतीने?
रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस बसण्याकरिता लाकडी बॉक्सची आसने आणि स्ट्रेचर असल्याचे आढळून आले. अधिक तपासणी केली असता रुग्णवाहिकेमधील लाकडी बॉक्स आणि ड्रायव्हरच्या सीटच्या मागे तयार केलेल्या विशेष कप्प्यात दमण बनावटीच्या दारूचा साठा आढळला. रुग्णवाहिकेमधील सात बॉक्समधून ८४ बल्क लिटर दमण बनावटीचा दारूसाठा जप्त केला. मात्र हा छापा पडताच रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून फरार झाला.

Web Title: Transport of alcohol by ambulance; Liquor worth nine and a half lakhs seized; Bharari squad action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.