तलासरीत घरकुल भ्रष्टाचार

By admin | Published: June 24, 2016 03:27 AM2016-06-24T03:27:59+5:302016-06-24T03:27:59+5:30

तुम्हाला बांधकामाचे काही कळत नाही घरकुल तुम्हाला बांधता यायचे नाही. आम्हीच तुम्हाला घरकुल बांधून देतो असे सांगून ग्रामसेवकाच्या संगनमताने गावाच्या पुढाऱ्यांनी आदिवासी

Trapped crib corruption | तलासरीत घरकुल भ्रष्टाचार

तलासरीत घरकुल भ्रष्टाचार

Next

सुरेश काटे,  तलासरी
तुम्हाला बांधकामाचे काही कळत नाही घरकुल तुम्हाला बांधता यायचे नाही. आम्हीच तुम्हाला घरकुल बांधून देतो असे सांगून ग्रामसेवकाच्या संगनमताने गावाच्या पुढाऱ्यांनी आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून घरकुलाचे पैसे काढून घेतले. परंतु गेल्या तीन चार वर्षात घरकुलाचे बांधकाम न केल्याने आदिवासी लाभार्थीवर ग्रामपंचायत कार्यालयाबरोबर पंचायत समितीचेही उंबरठे झजविण्याची पाळी ओढावली आहे.
याप्रकरणी सभापती वनाश्या दुमाडा यांनी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा केली परंन्तु कोणीही समाधानकारक उत्तरे देत नसल्याने अखेर आदिवासी लाभार्थी यांची झालेली फसवणूक लक्षात घेऊन सभापती वनाश्या दुमाडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. तसेच दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुमाडा यांनी पाहणी केली असता लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी एखादी गाडी दगड विटा टाकल्याचे दिसून आले घरकुल मिळणार या आशेने काही लाभार्थ्यांंनी आपले कुडाचे घरही तोडून टाकले त्यामुळे आता घरकुलही नाही आणि जुने घरही नाही अशी स्थिती झाली असून त्यांच्यावर भर पावसात उघडयावर राहायची वेळ आली आहे. लाभार्थ्यांचे पैसे बँकेत जमा होत असतात. त्यामुळे हे पैसे काढले कोणी? ते शोधून काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सीईओ काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Trapped crib corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.