ट्रॉमा सेंटर, अग्निशामक यंत्रणा कधी उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:15 AM2019-04-02T04:15:53+5:302019-04-02T04:16:18+5:30

दररोज लाखोंचा टोल ; सुविधाचा अभाव

Trauma Center, Fire Extinguishing System When to Set Up? | ट्रॉमा सेंटर, अग्निशामक यंत्रणा कधी उभारणार?

ट्रॉमा सेंटर, अग्निशामक यंत्रणा कधी उभारणार?

Next

शशिकांत ठाकूर

कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसाआड होणारे अपघात पाहता महामार्गालगत सुसज्ज अत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. मात्र मनोर ते तलासरी दरम्यान एकही अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले हॉस्पिटल नाही. त्यामुळे हा महामार्ग वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे.

डहाणू तालुक्यातील महामार्गालगत कासा उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ट्रॉमा सेंटरचा फलक लावण्यात आला खरा. मात्र तज्ञ डॉक्टर नाही, सुविधांचा अभाव त्यामुळे त्यामुळे प्रसार माध्यमे व नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला त्यामुळे पंधरा दिवसांत फलक काढण्यात आला. महामार्गवर सतत अपघात होतात २२ मार्च २०१४ रोजी चारोटीनाका या ठिकाणी रसायन टँकर उलटून होऊन मोठा स्फोट झाला होता. त्यामधे १० जणांचा बळी गेला होता तर १४ जण जखमी झाले होते. पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सरा हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. २२ जानेवारी २०१९ रोजी याच चारोटी नाक्यावरील उड्डाणपुलावर महामार्गावरून हायड्रोजन वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागून चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते.
त्यानंतर प्रोपिलीन गॅसच्या ट्रकचा चारोटीजवळ अपघात झाला होता सुदैवाने त्यातील गॅसची गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला होता तर मागील मिहन्यात चिंचपाडा येथे गाडीत शॉर्टिसर्कट झाल्याने ट्रक जागीच जळून खाक झाला होता .


रसायनांची वाहतूक करणारे टँकर खूप
मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर ते अच्छाड या 120 किलोमीटर अंतरामध्ये दोन टोलनाके असून या नाक्यावर लाखो रु पयांचा टोल वसूल केला जातो. कार जीपसाठी 60 रु पये , हलक्या वाहनासाठी 110 रु पये, ट्रक बससाठी 215 रुपये तर मोठ्या अवजड गाड्यांसाठी 345 रुपये एवढा भरमसाठ टोल देउनही सुविधांची मात्र वानवा आहे.या महामार्गावरून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्याही खूप मोठी आहे.

Web Title: Trauma Center, Fire Extinguishing System When to Set Up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.