पावसात गारठलेल्या पशुपक्ष्यांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:49 PM2019-07-28T23:49:25+5:302019-07-28T23:49:57+5:30

पक्ष्यांमध्ये चिमणीपासून घारींचा समावेश : काही दुर्मिळ पक्ष्यांचेही वाचवले प्राण

Treatment of nesting birds in the rain | पावसात गारठलेल्या पशुपक्ष्यांवर उपचार

पावसात गारठलेल्या पशुपक्ष्यांवर उपचार

Next

ठाणे : मागील दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्याने गारठलेल्या २८ पक्ष्यांना वेळेवर ठाण्यातील एसपीएस संस्थेच्या रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. यामध्ये चिऊताईपासून गगनभरारी घेणाऱ्या घारींचा तसेच दुर्मीळ ससाण्यांचा समावेश आहे.

उपचारानंतर या पक्ष्यांना मुक्त संचारासाठी ज्या परिसरातून आणले, त्या परिसरात सोडले जाईल. यातील जास्तीतजास्त पक्षी हे वनविभागाने दाखल केल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली. यंदा मान्सून लांबणीवर पडला, पण हवामान खात्याकडून वर्तवलेले अंदाज बºयापैकी खरे ठरताना दिसले. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात २६ जुलैला पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात वाºयामुळे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडली. तसेच झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले आहेत.
निवारा नसल्याने पावसात भिजल्यावर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. काही पक्ष्यांना न्यूमोनियासारखा आजारही होतो. अशा प्रकारे मागील दोन दिवसांत ठाण्यातील घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड, भांडुप आदी भागांतून गारठलेल्या अवस्थेतील २८ पक्ष्यांना पशुमित्रांसह वनविभागाने ठाणे एसपीएसए संस्थेच्या रुग्णालयात उपचारार्थ आणले. यामध्ये १२ घारी, १० ससाणे, तीन बगळे, दोन कावळे आणि एक चिमणीचा समावेश आहे.
या पक्ष्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली आहे. त्यांना शक्तिवर्धक टॉनिक, व्हिटॅमिनचे ड्रॉप देण्यात येत आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या रुग्णालयात वेळप्रसंगी जखमी झालेल्यांवर शस्त्रक्रिया किंवा मलमपट्टी केली. काही दिवसांत या पक्ष्यांना मुक्तसंचार करण्यासाठी सोडले जाईल, अशी माहिती पशुपक्षी वैद्य डॉ. सुहास राणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

डोंबिवलीतील पॉज संस्था मुक्त प्राण्यांच्या मदतीला धावली

बदलापुरातील पाणी ओसरल्यानंतर डोंबिवलीतील पॉज संस्थेने धाव घेत तेथील ७० प्राण्यांवर उपचार केले. पुरात अडकलेल्या १५० प्राण्यांची भूकही शमवली. उपचार केलेल्या प्राण्यांमध्ये सर्वाधिक ४० हून अधिक श्वान असून एक मांजर, गाय तसेच काही डुकरांचाही समावेश आहे. या संस्थेतील सदस्यांनी एका घरात शिरलेल्या सापाला बाहेर काढून सोडले. या संस्थेचे अभिषेक सिंग, प्रतिमा दातार, कुमार भट, सीमा वॉकापड्डी, प्रदीप विश्वकर्मा आणि निलेश भानगे अशा सहा जणांनी बदलापुरातील हेंद्रेपाडा, गौरीपाडा यासारख्या भागांत जाऊन प्राण्यांवर उपचारासाठी मदत केली. पुराच्या पाण्यात वाहून चाललेली गाय आणि पायाला जखम झालेला श्वान सद्य:स्थितीत पॉज संस्थेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती संस्थेचे भणगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Treatment of nesting birds in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.