धुंदलवाडीत भूकंपाबरोबर थंडीही प्रचंड वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:32 AM2018-12-24T03:32:18+5:302018-12-24T03:32:47+5:30

डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत.

The tremors have increased tremendously with tremors in Dhundalwadi | धुंदलवाडीत भूकंपाबरोबर थंडीही प्रचंड वाढली

धुंदलवाडीत भूकंपाबरोबर थंडीही प्रचंड वाढली

Next

- सुरेश काटे
तलासरी - डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत. सद्या या भागात थंडी वाढल्याने घराबाहेर रात्र काढताना त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे
या भागातील धुंदलवाडी, हलद पाडा, बहारे, सवणे, सासवंद व इतर गावात दोन तीन महिन्यापासून भूकंपाचे धक्के सतत बसत असताना शासकीय यंत्रणा व राजकारणी मात्र झोपेत होते. पण लोकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच यंत्रणा जागी झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली गाव पाड्यात मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येऊन भूकंपाबाबत माहिती देण्यात आली. भूकंपाच्या वेळी घेण्याची खबरदारी लोकाना सांगितली गेली. सासवंद येथील वेदांत रुग्णालयाजवळ भूकंप मापक यंत्र बसविण्यात आले. त्यामुळे या भागातील भूकंपाचे ठिकाण समजले व भूकंपाची माहिती मिळू लागली मात्र हे सोपस्कार उरकल्यावर शासकीय यंत्रणा पुन्हा झोपी गेली. भूकंप प्रवण क्षेत्रातील लोकांना काही झोप येत नाही. ते रात्र-रात्र जागून काढत आहेत. घराबाहेर थंडीचा तडाखा वाढला आहे, घरात झोपावे तर भूकंपाच्या धक्क्याने घर कोसळण्याची भीती तर लहान मुले दचकून घाबरून झोपेतून उठून रडत बसत आहेत. घरांना तडे गेल्याने ती कधीही कोसळून पडण्याची भीती यामुळे ग्रामस्थ घराबाहेर तात्पुरता मांडव टाकून रात्र काढत आहेत. पण वाढत्या थंडीचे काय थंडी अन आभाळातून पडणारे दव याने रात्र बाहेर काढणे अवघड झाले आहे.भूकंपाच्या धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत असतांना याभागात अफवांचे पीक ही वाढते आहे. त्यामुळे लोकात अजून भीतीचे वातावरण आहे.

घर दुरूस्ती करणार कशी?

महसूल विभागाने तडे गेलेल्या घरांचे पंचनामे केले पण भरपाईचे काय? याबाबत अजून जिल्हाधिकाºयांचे मौन आहे. त्यामुळे घरांची दुरुस्ती कशी करायची हा प्रश्न आता येथील लोकांना पडला आहे. भूकंपाच्या धक्क्याबरोबर या भागात चिंताजनक परिस्थिती आहे.

Web Title: The tremors have increased tremendously with tremors in Dhundalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.