आदिवासींचा विकास कागदावरच, रोजगार द्या! भटकंतीने थकल्यानंतर पुन्हा आपल्या गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:50 AM2018-03-10T05:50:15+5:302018-03-10T05:50:15+5:30

शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.

 Tribal development on paper, give employment! After wandering tired, again in your hometown | आदिवासींचा विकास कागदावरच, रोजगार द्या! भटकंतीने थकल्यानंतर पुन्हा आपल्या गावी

आदिवासींचा विकास कागदावरच, रोजगार द्या! भटकंतीने थकल्यानंतर पुन्हा आपल्या गावी

Next

- शौकत शेख
डहाणू - शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.
दिवाळी सण संपताच आपल्या कुटुंबानिशी डहाणू, चिंचणी, वानगाव, बोईसर, पालघर इत्यादी भागात स्थलांतरीत झालेल्या आदिवासी कुटुंबाला सध्या काम मिळत नसल्याने गेल्या पंधरा वीस दिवसांपासून त्यांनी जंगलात जाणे सुरू केले आहे. डहाणू तसेच परिसरात असलेल्या विकासकांचे सदनिका पडून असल्याने तसेच इमारतीचे बांधकाम बंद असल्याने मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात सत्तर टक्केपेक्षा अधिक आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्ग पलीकडील (पूर्व) दुर्गम भागात कायमस्वरुपी रोजगार नसल्याने येथील आदिवासी वीटभट्टी, इमारती बांधकाम तसेच बागायगती व्यावसायिकांकडे रोजगारासाठी दरवर्षी जात असतात.
दिवाळीनंतर डहाणूचा कैनाड, सायवन, भिरोंडा, रायपूर, गंजाड, बापूगाव, चरी, बांधघर, कोसेसरी, भवाडी, दिवसी,दाभाडी, निंबापूर, धानिवरी, महालक्ष्मी, कोदाळ, आंबेसरी, कांदरवाडी, धुंदलवाडी, चिंचले, सुरवरआंबा, दाभोण इत्यादी गावे तसेच पाडे ओस पडत असतात. यावर्षी देखील शेकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात डहाणूच्या बंदरपट्टी भागात मुक्कामाला होती. परंतु बहुसंख्य ठिकाणी कामे बंद असल्याने आदिवासीची घोर निराशा झाली आहे.
विशेष म्हणजे रोजगार मिळविण्यासाठी आदिवासी कुटुंबे जिल्हाभरात फिरत होती. परंतू त्यांना दोन चार, आठ, दिवस पुरतेच काम मिळत होते. त्यामुळे एका शहरातून दुसºया शहरात रोजगारासाठी भटकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. दरम्यान, रोजगार मिळत नसल्याने अनेकजण पुन्हा गावाकडे परतू लागली आहेत.

शहराकडे काम मिळत नसल्याने आदिवासींची दुरावस्था

डहाणूच्या दुर्गम भागांतील दºयाखोºयात डोंगरकुशीत राहणारे आदिवासी कुटुंबे चार, पाच महिने रोजगार मिळेल या आशेने जिल्ह्यातील चिंचणी, बोईसर, डहाणू, वानगाव, धा. डहाणू, वाढवण, तारापूर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून आले होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे.

या वर्षी शेती, बागायती, इमारती बांधकाम व्यवसायाला मंदि असल्याने असंख्य ठिकाणी कामे बंद आहेत, त्यामुळे शहरामध्ये कामाच्या शोधात भटकणाºया आदिवासीच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून आदिवासी कुटुंब पुन्हा जंगलाकडे वळू लागली आहेत. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे.

Web Title:  Tribal development on paper, give employment! After wandering tired, again in your hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.