भातखरेदीत आंबिस्ते येथे आदिवासींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:10 PM2018-08-22T23:10:36+5:302018-08-22T23:11:52+5:30
व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल; क्विंटलच्या पोत्यात भरले सव्वाशे किलो
- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यातील उर्से ग्रामपंचायत हद्दीतील आंबीस्ते गावात भातखरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाºयांनी आदिवासी शेतकºयांची फसवणूक केल्याची घटना येथे घडली. याबाबत ग्रामस्थांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून ट्रकही जप्त केला आहे. या व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भातखरेदी करण्यासाठी अनेक व्यापारी डहाणूच्या आदिवासी भागात येतात. मंगळवारी अंबिस्ते गावात एक व्यापारी भात खरेदीसाठी आला होता. आदिवासी शेतकºयांचे भात खरेदी करून त्याची भराई व तोलाई केली जात असतांना या व्यापाºयाच्या चलाखीचा शेतकºयांना संशय आला. निरीक्षणाअंती जागरूक नागरिक सतेंद्र मातेरा यांनी फसवणूक कशी होते आहे. ती सर्वांसमोर उघड केली. या व्यापाºयांनी आदिवासी शेतकरी रमाकांत पारधी, विलास चित्या पारधी, अनिल विकास पारधी, राजू देवू धापसी, सखाराम देवू धापसी यांची फसवणूक केली होती.
दरम्यान हा व्यापारी शेतकºयांकडून भात खरेदी करतांना एका क्विंटलच्या गोणीत १०० किलो भात भरण्याऐवजी मोठी गोणी वापरून ती मध्ये १२५ किलो भात भरत असे. आणि शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेवून हिशोब देताना केवळ ८० किलो प्रमाणे रक्कम देत असे. अशा प्रकारे त्याने येथील आदिवासी शेतकºयांची भातखरेदीत ५३ क्विंटलची फसवणूक केल्याचे उघड झाले.
पोलीस पाटील नागरिक यांची जागरूकता
येथील पोलीस पाटील यशवंत म्हसकर, जागरूक नागरिक मधुकर पाटील, रमेश म्हसकर, अन्य ग्रामस्थ यांनी व्यापाºयाच्या फसवणूक प्रकरणी वाणगाव पोलिसात तक्रार दाखल केली.
व्यापारी सदानंद म्हसे याला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक गरड पुढील कारवाई करत आहेत. त्याने अन्य काही गावात अशाच रितीने कुणाची फसवणूक केली आहे काय? याचाही तपास सुरु आहे.
आदिवासी शेतकर्यांची व्यापाºयाकडून फसवणूक झाल्याने त्याविरु द्ध पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी. - यशवंत म्हसकर, पोलीस पाटील
यापूर्वीही ७ ते ८ वेळा हे व्यापारी भातखरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी गरीब व निरक्षर आदिवासी शेतकºयांची त्यांनी फसवणूक केली होती. - रमेश म्हसकर, ग्रामस्थ