पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:05 AM2017-10-26T03:05:25+5:302017-10-26T03:05:29+5:30

पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज आदिवासी एकता परिषदेसह इतर संघटनांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला

Tribal front of the office of the Superintendent of Police on Friday to protest against the crackdown by the police officers. | पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

Next

पालघर: आदिवासी एकता परिषदेचे नेते व आदिवासी सेवक काळूराम धोदडे (काका) यांना पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिका-यांनी केलेल्या धक्काबुक्की व अपशब्दांच्या निषेधार्थ आज आदिवासी एकता परिषदेसह इतर संघटनांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला व काकांना धक्काबुक्की करणारे पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
२३ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील लोवरे व निहे या दोन गावात वडोदरा एक्सप्रेस वे प्रकल्पासाठी गावातील जमीनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आले असता योग्य त्या परवानग्या नसल्याने व ही गावे पेसा असून त्यांच्या ग्रामसभांचे ठराव नसल्याने संबंधित अधिकाºयांना ती मोजणी करता येणार नसल्याचे या गावकर्यांनी सांगितले व त्याला विरोध दर्शविण्यासाठी काळुराम धोदडेंसह इतर संघटनेचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. निहे गावात या मोजणीला तीव्र विरोध झाल्यामुळे ती होऊ शकली नाही व तसा पंचानामाही अधिकाºयांनी लिहिला.
लोवरे गावातही लोकांच्या तीव्र विरोधामुळे मोजणी होऊ शकली नाही व अधिकारी तसा पंचनामा बनविण्याच्या तयारीत असताना दुपारच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल लोवरे येथील घटनास्थळी पोचले. त्यांनी ग्रामस्थांना दमबाजी करून अधिकाºयांना शेतात जाऊन मोजणी करण्यास सांगितले. त्यावर तिथे उपस्थित आदिवासी एकता परिषदेचे काळुराम धोदडे यांनी गोयल यांना अनुसूचित कायदा लागू असलेल्या गावाच्या ग्रामसभेचे ठराव नसताना ही मोजणी कशी करणार? व मोजणीचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? अशी विचारणा केली असता गोयल यांनी हमको कायदा मत सिखावो असे उलट उत्तर देत धक्काबुक्की केली. यावर उपस्थितांनी गोयल यांना धोदडेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा जाब विचारला.
मात्र गोयल यांनी मै आदिवासी बादिवासी कुछ नाही जानता, ऐसे आदिवासी सेवक बहोत देखे है असे उत्तर दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तर दुसरीकडे लोवरे येथील कामिना पाटील या वृद्धेच्या शेतात मोजणी कर्मचारी विनापरवानगी जबरदस्ती घुसले. त्यांनी त्यांना अडविले असता त्यांनाही कर्मचाºयांनी धक्काबुक्की करून त्यांचा अवमान केला, असा संघटनेने आरोप केला आहे.
पालघर रेल्वे स्थानकावरून आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, कष्टकरी संघटना, शेतकरी संघर्ष समितीसह इतर संघटनांच्या पाठिंब्यासह हजारोच्या संख्येने निघालेल्या मोर्चाने निवेदन पोलीस अधिक्षकांना देण्यासाठी अधिक्षक कार्यालयाजवळ येऊन थांबला.मात्र अधिक्षकांना काम आल्याने त्यांची भेट मोर्चेकºयांशी रस्त्यावरच झाली तिथे अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी मोर्चेकºयांशी चर्चा केली. मोर्चेकºयांनी पुढे जाऊन कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांना दिले.

Web Title: Tribal front of the office of the Superintendent of Police on Friday to protest against the crackdown by the police officers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.