पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासीची भटकंती
By admin | Published: November 18, 2015 12:05 AM2015-11-18T00:05:48+5:302015-11-18T00:05:48+5:30
दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या
मोखाडा : दिवाळी संपताच तालुक्यातील आदिवासींची स्थलांतरास सुरवात झाली आहे. घर, गावपाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी येथे शेकडो मैल दूर रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे. मोखाडा तालुका व गाव-पाड्ये दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने नेहमीच शासनांच्या विकास योजना पासुन उपेक्षित राहीले तर काही ठिकाणी कागदोपत्री विकास झाला आहे.
आजही शासनाच्या दुर्लक्षामुळे महागाईच्या काळात १०० रुपये प्रतीदिन मजुरीतुनही आपला व आपल्या कुटुंबाचा रहाट गाडा कसा चालवायचा हा मोठ्ठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर शासनाने आदिवासीचे स्थलांतर थांबविण्यासाठी मनेरगा, रोजगार हमी, मजगी, घरकुल आदी योजना राबविल्या पण याही योजनांना सरकारी बाबू आणि काही लोकप्रतिनिधीची दृष्ट लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडाच्या मोळ्या, विटभट्टी, लहान मोठ्या इमारत बांधकामावर बिगारी म्हणून काम करावे लागत आहे. विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आदिवासींना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुला मुलींना देखील शिक्षणावर पाणी सोडून कामामध्ये मदत करावी लागते. (वार्ताहर)
रोजगार हमी च्या कामांसंदर्भात आजच बैठक झाली आहे तालुक्यातून दोन गावान मधुन कामांची मागणी करण्यात आली आहे. - जयराज सुर्यवंशी
(मोखाडा तहसीलदार)