पोलिसांचीही श्रद्धा अटळ
By Admin | Published: September 11, 2016 02:03 AM2016-09-11T02:03:30+5:302016-09-11T02:03:30+5:30
‘सदरक्षणाय् खलनिग्रणाय’ हे बोधवाक्य प्रमाण मानून ड्यूटी फस्ट या उक्ती प्रमाणे जीवन व्यतित करणारे पोलीसांच्या आयुष्यामध्ये कुटुंबासह
विक्रमगड/तलवाडा : ‘सदरक्षणाय् खलनिग्रणाय’ हे बोधवाक्य प्रमाण मानून ड्यूटी फस्ट या उक्ती प्रमाणे जीवन व्यतित करणारे पोलीसांच्या आयुष्यामध्ये कुटुंबासह सण साजरा करण्याचे योग फारच कमी येतात. मात्र, त्यांच्यामुळेच समाजातील सर्वजण सुरक्षितपणे सण उत्सव साजारा करतात. हे जरी खरं असल तरी विक्रमगडच्या पोलीस लाईनमध्ये हा उत्सव दहा दिवस उत्साहाने साजरा होतो. हा बाप्पा पोलिसांचा गणराया म्हणून ओळखला जातो.
एरव्ही सतत कामामुळे काहीशा मानसिक तणावाखाली वावरणारे पोलीस गणेश आगमन ते विसर्जनापर्यंत सर्व ताण तणाव विसरुन भक्तीमध्ये मग्न होउन लाडक्या गणरांची मनोभावे सेवा करतांना दिसतात. दुपार, सायंकाळच्या आरतीला सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली ड्युटी निभावून आवर्जुन उपस्थित राहतात. यादरम्यान भजन, कीर्तन, भंडारा अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलिसांच्या या गणरायाच्या दर्शनाला तालुक्यातील सर्व जाती धर्मातील नागरिक, भक्तगण येत असल्याने एकात्मतेचा संदेष देणारा अशीही या गणरायाची ख्याती गेली अनेक वर्षांपासूनची आहे.गणेशोत्सवावेळी पोलिसांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसते. पोलिसांच्या या गणरायाने अनेकांची इच्छापूर्ती केली आहे. त्यामुळे बदली होऊन आलेले अधिकारीही परंपरेनुसार चालत आलेली गणरायाची स्थापना करुन दहा दिवस भक्तीभावाने गणरायाची मनोभावे सेवा करीतात. (वार्ताहर)