बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:41 PM2019-03-02T23:41:29+5:302019-03-02T23:41:33+5:30
कुपोषणआणि बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सभेत केले.
पालघर : कुपोषणआणि बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सभेत केले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समिती सभा शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवा तत्परतेने गरजू लोकांपर्यंत पोहोचिवण्यात याव्यात असे आदेश खासदार गावित यांनी दिले. तसेच अमृत आहार योजने अंतर्गत अंगणवाडी सेवकांचे मानधन वेळच्या-वेळी निर्गमित करण्यात यावेत, असे ही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यानी सांगितले. यावेळी विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला असून अनेक महत्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यात आला.
प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, वसई विरार महानगर पालिकेचे आयुक्त बळीराम पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक (प्रभारी) तुषार माळी, दिशा समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, सर्व खाते प्रमुख आदि अधिकारीआणि कर्मचारी उपस्थित होते. सभेत केंद्रपुरस्कृत योजनेच्या कामांचा भौतिक व आर्थिक आढावा घेण्यात आला. भारत सरकारच्या आदेशानुसार केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती अधिक्रमीत करून जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत महावितरण, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा अभियान, पान /४