रेशनवर सर्व आदिवासींना तूरडाळ, खाद्यतेल मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:56 AM2019-06-27T00:56:44+5:302019-06-27T00:56:58+5:30

पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे.

 Tudadal, edible free of cost to all the tribals on ration | रेशनवर सर्व आदिवासींना तूरडाळ, खाद्यतेल मोफत

रेशनवर सर्व आदिवासींना तूरडाळ, खाद्यतेल मोफत

Next

मोखाडा : पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे. श्रमजीवीची २०१७-१८ पासून ही मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिले होते. कुपोषणाची दाहकता असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या कुपोषणाने प्रभावित तालुक्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. या प्रयोगाच्या यशानंतर ही योजना राज्यभर अंमलात येईल. आवश्यक पोषण घटकांच्या अभावामुळे आदिवासी मातांमध्ये कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे. हे श्रमजीवीने सरकार दरबारी मांडले होते. याबाबत अनेक प्रखर आंदोलने झाली. अखेर या योजनेला शासनाचा हिरवा कंदील मिळाला. १० जुलै २०१९ पासून या योजनेचा अंमल होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न २०१६ साली पुन्हा ऐरणीवर आला होता. श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रस्त्यावर उतरून रान उठवले होते. दुसऱ्या बाजूला याबाबत उपाययोजना काय असाव्यात, याबाबतही श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडितांच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करून विवेक पंडित यांनी प्रत्यक्ष आदिवासींच्या भोजनात आवश्यक जीवनसत्त्व असलेले अन्नपदार्थ असावे असे सांगितले होते. त्यासाठी रेशनवर खाद्यतेल आणि तूरडाळ असावी, ही मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘‘वर्षा’’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा सचिवांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरही संघटनेने वारंवार याबाबत पाठपुरावा केला.श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गरजू गरीब आदिवासींचे मागणी अर्ज शासनाकडे दाखल केले होते. याबाबत आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जव्हार आणि मोखाड्यात या योजनेचा प्रयोग होणार आहे. पांढºया शिधा पत्रिका वगळून सर्व केशरी, पिवळ्या, अंत्योदय शिधा पत्रिकाधारक आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळणार असून या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरातील आदिवासींना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी हिताच्या घेतलेल्या या निर्णयाचे श्रमजीवीेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Web Title:  Tudadal, edible free of cost to all the tribals on ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.