तुळिंज ठाण्यात एकाच दिवशी १० दखलपात्र, २२ अदखलपात्र गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:00 AM2019-06-09T00:00:20+5:302019-06-09T00:00:46+5:30
तपासाचे पोलिसांपुढे आव्हान
नालासोपारा : वाढती लोकसंख्या आणि अपुरा पोलीस बळ यामुळे गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी तुळींज पोलीस सपशेल अपयशी ठरले असून हताश झाले आहे. लोकसंख्येच्या आणि गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून तुळींज पोलीस ठाण्याला पोलीस बळ जास्त देणे गरजेचे असतांनाही वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याने सध्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मरण झालेले असून इकडे आड आणि तिकडे विहीर अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
शुक्र वारी एकाच दिवशी तुळींज पोलीस ठाण्यात १० दखलपात्र गुन्हे व २२ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये १ अपहरण, २ मोटार सायकल चोरी, १ डिझेलची चोरी, १ घरफोडी आणि ३ मारामाºया असे दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे.
मोठ्या प्रमाणात वाढती गुन्हेगारी पाहता अंकुश लावण्यासाठी पोलीस बळ मोठ्या प्रमाणात आवश्यक असताना तुटपुंज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच कसरत आणि तारांबळ होत आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर गेल्यामुळे कमी प्रमाणात असलेल्या पोलिसांवर ताण पडलेला आहे. गुन्हेगारीचा आकडा मोठा असल्याने कोणीही नवीन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तुळींज पोलीस ठाण्यात बदली करवूनही घेत नाही व तुळींज पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेले अधिकारी व कर्मचारी हजरही होत नाही.
१८ पोलीस अद्याप हजर नाही.....
तुळींज पोलीस ठाण्यात 18 पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती झाल्याची यादी आत्ताच प्रसिद्ध झाली पण अद्याप पर्यत एकच पोलीस मुख्यालयातून तुळींज पोलीस ठाण्यात हजर झाला असून १७ कर्मचारी अद्याप हजर झालेले नाही.
७० पोलीस
अधिकारी इतर ठिकाणी...
तुळींज पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांची साईड ब्रँचला बदली झाल्याने त्यांची जागा अद्याप रिकामी आहे.
3 पोलीस निरीक्षकांची आवश्यकता असताना एकमेव पोलीस निरीक्षक राजेश जाधव तुळींज पोलीस ठाणे सांभाळत आहे.
या पोलीस ठाण्यातून जनरल बदलीमध्ये 70 अधिकारी व पोलीसांच्या बदल्या झाल्याने ठाणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड व इतर ठिकाणी पाठविण्यात आलेले आहे.