तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:14 AM2019-09-21T01:14:25+5:302019-09-21T01:15:20+5:30

तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किमी. परिसर इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर केल्याने यात वसई तालुक्यातील २८ गावांचा समावेश झाला आहे.

Tungareshwar Sanctuary Complex Eco-Sensitive | तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

तुंगारेश्वर अभयारण्य परिसर इको सेन्सेटीव्ह

googlenewsNext

पारोळ : तुंगारेश्वर अभयारण्याच्या चार किमी. परिसर इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर केल्याने यात वसई तालुक्यातील २८ गावांचा समावेश झाला आहे. यामुहे येथील वीटभट्टी आणि दगडखाणी यांवरही बंदी घालण्यात आली असून त्यांचे गौणखनिज परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील भूमिपुत्रांच्या व्यवसायावर गदा येणार आहे.
वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवतालचा परिसर इको सेन्सेटीव्ह झोन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना काढून सर्व राज्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी तुंगारेश्वर अभयारण्य इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढून तुंगारेश्वरच्या आसपासच्या परिसराचा इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. २८ गावांच्या परिसरातील दगड खाणी तसेच वीटभट्टीचे शुल्क, वाहतूक परवाने रद्द करण्याचे आदेश येथील तलाठी सजा यांना दिले आहेत.
>इको सेन्सटीव्ह झोनमधील २८ गावे
पारोळ, माजीवली, तिल्हेर, खार्डी, नागला, शैलोतर, पोमन, कामण, देवदळ, चिंचोटी, कोलंही, चंद्रपाडा, टीवरी, राजावली, गोखिवरे, सातीवली, वालीव, पेल्हार, खैरपाडा, टोकरे, शिरगाव, दहिसर, कणेर, शिरसाड, मांडवी, चांदीप, शिवणसई, उसगाव.
>संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्यवनसंरक्षण संचालकांचे पत्र महसूल विभागाकडे आले असून याबाबतच्या सूचना येथील महसूल अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. - किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

Web Title: Tungareshwar Sanctuary Complex Eco-Sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.