रिलायन्स गॅस चेंबरला ठोकले टाळे, संतप्त शेतकऱ्यांचा कुलूप काढण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:06 AM2018-12-27T03:06:08+5:302018-12-27T03:06:51+5:30
या भागातून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात असून यासाठी रिलायन्सने आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित केली आहे परंतु तिचा योग्य मोबदला रिलायन्स देत नसल्याने येथील पीडित आदिवासी शेतकरी आंदोलने करीत आहे
तलासरी : या भागातून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात असून यासाठी रिलायन्सने आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित केली आहे परंतु तिचा योग्य मोबदला रिलायन्स देत नसल्याने येथील पीडित आदिवासी शेतकरी आंदोलने करीत आहे, एवढेच काय शासनाचा निर्धारित असलेला ५९८०० रु पयांचा एकरी दरही देण्यास रिलायन्सने असमर्थता दाखविली. आपल्याला रिलायन्स योग्य दर देत नसल्याने बुधवारी सकाळी आदिवासी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तालुक्यातील उपलाट येथे असलेल्या गॅस लाइनच्या चेंबरला पिडित शेतकºयांनी टाळे ठोकले
या वेळी तलासरी पोलसानी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना बाजूला केले. रिलायन्स गॅस लाइन पिडित आदिवासी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुकर काकरा, तलासरीचे गोविंद हरपले यांच्या नेतृत्वाखाली येथील आदिवासी शेतकºयांनी हे आंदोलन केले. योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यंत गॅस चेंबरचे टाळे काढणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिलायन्सचा कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. नुकतेच महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील तलासरी येथे महामार्ग अडवून रिलायन्स च्या विरोधात आंदोलन केले होते.