पंचवीस हजार इनाम ठेवलेला कुत्रा अखेर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:41 PM2019-12-31T22:41:39+5:302019-12-31T22:42:39+5:30

वसईत काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र अपहरणकर्त्याने चोरलेल्या ठिकाणीचा सोमवारी कुत्र्याला सोडून पळ काढला.

Twenty-five thousand prize dogs were eventually found | पंचवीस हजार इनाम ठेवलेला कुत्रा अखेर सापडला

पंचवीस हजार इनाम ठेवलेला कुत्रा अखेर सापडला

Next

विरार : वसईत काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र अपहरणकर्त्याने चोरलेल्या ठिकाणीचा सोमवारी कुत्र्याला सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कुत्र्याबद्दल माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे इनामही जाहीर करण्यात आले होते. लाडका कुत्रा ‘हॅप्पी’ अखेर सापडल्यामुळे मालकाला हायसे वाटले आहे.

वसईच्या गोखिवरे येथील रहिवासी असलेल्या रवी धोत्रे यांचा साधारण एक वर्षाचा पाळीव कुत्रा पेट्रोल पंपावर हरवला होता. धोत्रे कुटुंब कर्नाटकमध्ये आपल्या गावी गेले असता त्यांनी हा कुत्रा आपल्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपावर कर्मचाºयाच्या देखरेखीखाली ठेवला होता. मात्र शुक्र वारी रात्री पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीवरील दोघांनी या कुत्र्याचे अपहरण केले होते. शनिवारी धोत्रे पेट्रोल पंपावर आले तेव्हा कर्मचाºयानी त्यांना कुत्रा हरवल्याची माहिती दिली. यानंतर त्यांनी आपल्या पेट्रोल पंपाचा सीसीटीव्ही तपासला. त्यामध्ये दोन दुचाकीस्वारांनी हॅप्पीचे अपहरण केल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे धोत्रे यांचा १२ वर्षाचा मुलगा हॅप्पीच्या हरवण्याने व्यथित झाला होता. दोन दिवसांपासून तो जेवलाही नव्हता. त्यामुळे रवी धोत्रे चिंतेत होते. दरम्यान, हॅप्पी हरवल्याच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमात आल्यामुळे अपहरणकर्त्याची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे अपहरणकर्ते सोमवारी चारचाकी घेऊन पेट्रोल पंपावर आले. या वेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर मागचा दरवाजा उघडून हॅप्पीला सोडून पळ काढला.

Web Title: Twenty-five thousand prize dogs were eventually found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.